Advertisement

कोल्हटकर महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ संपन्न

कोल्हटकर महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ संपन्न
प्रतिनिधी जळगाव जामोद - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात कनिष्ठ विभागाचा गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ संपन्न झाला.अध्यक्षस्थानी जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल होते तर लेखक,कवी तथा समूपदेशक अरविंद शिंगाडे हे प्रमुख मार्गदर्शक होते.
      जळगाव शिक्षण मंडळाचे सचिव अनुप पुराणिक, सहसचिव मिलिंद जोशी, प्रभारी प्राचार्य डॉ. प्रवीण डाबरे यांचेसह पर्यवेक्षक प्रा.जी.एस. वानखडे,अधीक्षक संजय गाडेकर,कार्यक्रम प्रभारी प्रा.ऋषिकेश कांडलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सरस्वती माता व गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने समारंभाची सुरुवात झाली.मान्यवरांच्या स्वागतानंतर पुनम मानकर, गौरी करांगळे, स्नेहल भोपळे व शितल फेरण या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. अरविंद शिंगाडे यांचा यावेळी प्राचार्य व पर्यवेक्षक यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
         पर्यवेक्षक वानखेडे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. यानंतर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये रोहिणी धुळे या विद्यार्थिनीने सर्वाधिक ११ बक्षिसे पटकावली. बक्षीस वितरणाचे संचालन प्रा.रामेश्वर सायखेडे व प्रा.निलीमा भोपळे यांनी केले.यावेळी आरती नीतवणे व वैभव घुले या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.प्राचार्य डॉ. प्रवीण डाबरे यांच्या मार्गदर्शनानंतर अरविंद शिंगाडे यांनी विद्यार्थ्यांनी एकाग्र चित्ताने अभ्यास करून यश संपादन करावे व आयुष्यात उच्च उद्दिष्ट ठेवावे असे सांगितले.
                     अनिल जयस्वाल यांनी विद्यार्थीनी अभ्यासासोबतच इतरही कलागुण आत्मसात करून अष्टपैलू व्यक्तिमत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. समारंभाचे संचालन प्रा. व्ही.पी. बावस्कर यांनी केले तर प्रा.ऋषिकेश कांडलकर यांनी आभार मानले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.या समारंभासाठी प्रा.आर.एस. देवकर,प्रा.वसंत चव्हाण,प्रा.व्ही.बी.झोपे, प्रा.गणेश जोशी,प्रा.आकाश निलजे,प्रा.आर.एस.फाळके, प्रा.भाग्यश्री जाणे,समाधान निलजे,बाबुराव चव्हाण, गजानन वानखडे यांनी परिश्रम घेतले.
*(फोटो- विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करताना मान्यवर)*

Post a Comment

0 Comments