भाजपा आमदार गणपत गायकवाड याने गोळीबाराचा निषेध - प्रसेनजीत पाटिल राष्ट्रवादी नेते
उल्हासनगर येथे भाजपा आमदार गणपत गायकवाड याने शिंदे सेनेचे शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक महेश गायकवाड व राहुल पाटिल यांच्यावर पोलिस निरिक्षकांच्या कार्यालयात दिवसाढवळ्या गोळीबार केला. या घटनेचे पड़साद राज्यभर उमटत आहेत. सरकार मधली आमदार अश्या प्रकारे कायदा हातात घेत असल्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटनीस तथा जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटिल यांनी जळगाव जामोद येथे पक्षाच्या पदाधिकार्यासह महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर मौनव्रत करुन सदर घटनेचा निषेध व्यक्त केला. कायदा सुव्यवस्था राखन्यात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. भाजपा आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर गुंडगिरी तथा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत भाजपा त्या आरोपा संदर्भात भूमिका घेणार की स्वपक्षातील आमदारावर कड़क कार्रवाई करणार हे राज्यातील जनता बघणार असल्याचे प्रतिपादन प्रसेनजीत यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा प्रवक्ता करीम खान,विधानसभा अध्यक्ष विश्वास भालेराव, शहराध्यक्ष ईरफान खान,माजी नगरसेवक संजय देशमुख, जिल्हा सरचिटनीस मोहसीन खान,महादेव भालतड़क, दत्ता डिवरे, सिद्धार्थ हेलोड़े, हनुमंतराव देशमुख,विठ्ठल वाघ,शेख ताहेर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments