आर. एम. तायडे मलकापूरचे नवे तहसीलदार
प्रतिनिधी नागेश सुरंगे
बुलडाणा जिल्ह्यातील पाच तहसीलदारांची बदली लोकसभा निवडणुकीच्या सार्वत्रिक अनुषंगाने तहसीलदार संवर्गातील काही अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये एकूण २१ अधिकाऱ्यांचा समावेश असून, बुलडाणा जिल्ह्यातील पाच तहसीलदार जिल्ह्यातून स्थानांतरित करण्यात आले आहे. उपसचिव अजित देशमुख यांच्या शासकीय आदेशानुसार बुलडाण्याचे तहसीलदार रुपेश खंदारे यांच्या जागी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील व्ही. एस. कुमरे यांना बुलडाणा येथे तहसीलदार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. खंदारे ४ ऑक्टोबर २०२० रोजी बुलडाण्याचे तहसीलदार म्हणून रुजू झाले होते. चिखलीचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांची तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कव्हळे यांच्या
जागी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील संतोष काकडे चिखलीचे तहसीलदार म्हणून पदभार सांभाळतील. तिसरी बदली मलकापूर येथील तहसीलदार आर. यू. सुरडकर सुरडकर यांची झाली आहे. त्यांना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे पाठवण्यात आले असून, बाळापूर येथील तहसीलदार आर. एम. तायडे मलकापूरचे नवे तहसीलदार असणार आहेत.
शेगावचे तहसीलदार समाधान सोनवणे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा या ठिकाणी पदभार घेतील, तर त्यांच्या जागी बार्शीटाकळी येथून आलेले डी. आर. बाजड शेगावची सूत्रे सांभाळतील. संग्रामपूर येथील तहसीलदार योगेश्वर टोपे वाशीम येथील जिल्हा अधीक्षक कार्यालयात स्थानांतरित करण्यात आले आहे. आर्णीचे तहसीलदार पी. झेड. भोसले संग्रामपूरचे नवे तहसीलदार असणार आहेत.
0 Comments