Advertisement

ओ बी सी इतर मागास प्रवर्गातील समाजाच्या भावना दुखवणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करा

ओ बी सी इतर मागास प्रवर्गातील समाजाच्या भावना दुखवणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करा

शेगाव जिल्हा प्रतिनिधी 
 आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध शेगाव पोलिसात तक्रार शेगाव - महाराष्ट्र राज्याचे केबिनेट मंत्री
छगन भुजबळ यांच्या बाबत अर्वाच्च भाषेचा वापर करून ओ बी सी इतर मागास प्रवर्गातील समाजाच्या भावना 
दुखवणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी ओ बी सी समाज बांधवांनी शहर ठाणेदार सुनील अंबुलकर यांना निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा आरक्षण जाहीर केले आहे. मंत्री छगन भुजबळ हे ओ बी सी इतर मागास प्रवर्गाचे प्रतिनीधित्व करीत असून ओ बी सी मधून मराठा आरक्षण देऊ नये अशी कायदेशीर व वैद्यानिक भूमिका प्रखरतेने मांडीत आहेत.त्याअनुषंगाने ३१ जानेवारी रोजी गैरकैफियतदार आरोपी आमदार संजय गायकवाड यांनी समाज माध्यमासमोर ओ बी सी नेते छगन भुजबळ यांच्या बाबतीत अर्वाच्च भाषेचा वापर करून भुजबळांना कमरेत लाथ घालून मंत्री मंडळातून बाहेर काढा कोणाचाही बाप हे मराठा आरक्षण रोखू शकणार नाही असे विधान केले.सदर विधानावर शेगाव शहरातील ओ बी सी इतर मागास प्रवर्गातील समाजातील बांधव यांच्या भावना दुखावल्या असून समाज प्रतिष्ठेला ठेच लागली आहे.त्यामुळे गैरकैफियतदार आरोपी आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर गजानन हाडोळे,संजय कलोरे, राजू पाटील शेगोकार, पी एम घाटोळ,संतोष घाटोळ, अरुण घाटोळ, दिनेश लहाने आदीसह शेकडो समाज बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments