Advertisement

राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरा अंतर्गत "एड्स जनजागृती व महिला सशक्तीकरण" मार्गदर्शनपर कार्यक्रम

राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरा अंतर्गत "एड्स जनजागृती व महिला सशक्तीकरण" मार्गदर्शनपर कार्यक्रम
प्रतिनिधी जळगाव जामोद
सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव जामोद द्वारा संचालित व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम सखारामपुर, चावरा-इलोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना *श्वासवत विकासासाठी युवक* या संकल्पनेवर श्रमसंस्कार विशेष शिबिरामध्ये आज दि.9 फेब्रुवारी 2024 रोजी "एड्स जनजागृती आणि महिला सशक्तीकरण" या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमास तिन्ही महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सहभाग सुद्धा नोंदविला.

सदर कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.अनिकेत उमाळे (रा.से.यो. उद्यानविद्या महाविद्यालय), प्रमूख मार्गदर्शक म्हणून डॉ.गजानन देशमुख (जिल्हा समन्वयक, एड्स विभाग बुलढाणा), डॉ.संदीप बोंबटकर तसेच कु.कुळकर्णी मॅडम आणि महाविद्यालयातील प्रा.अविनाश आटोळे, प्रा.दत्ता तायडे, प्रा.प्रमोद डव्हळे, प्रा.कु.सोनाली चव्हाण, प्रा.कु.स्नेहा निर्मळ, प्रा.कु.अनिता इंगळे, प्रा.कु.प्रतिक्षा बोरखडे उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments