प्रतिनिधी जळगाव जामोद
सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव जामोद द्वारा संचालित व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच उद्यानविद्या महाविद्यालय, जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम सखारामपुर, चावरा-इलोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना “शाश्वत विकासासाठी युवक” या संकल्पनेवर आधारित श्रमसंस्कार विशेष शिबिरामध्ये आज दि.६ ते ९ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकामध्ये समाजाप्रती सेवाभाव निर्माण व्हावा तसेच समाजातील प्रत्येक घटकाप्रती सहकार्याची भावना जागृत होणे गरजेचे आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज दि.१० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता गावातील सर्व लहान मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर गावातील शाळेमध्ये आयोजित करण्यात आले होते. दरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी आज सकाळी संपूर्ण गावामध्ये जाऊन प्रत्येक घरांला भेटी देऊन मोफत आरोग्य तपासणी शिबिराची माहिती दिली आणि सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असा संदेश दिला.
सदर शिबिरास जळगांव जामोद शहरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ तथा सातपुडा शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.संदिप वाकेकर, जळगांव जामोद शहरातील जनरल फिजिशियन डॉ.राजेश वाकोडे आणि दंतचिकित्सक डॉ.राम भोपळे यांनी सर्व लहान मुलांची आपुलकीने आरोग्यविषयक विचारपूस करून उत्तम प्रकारे आरोग्य कसे अबाधित ठेवावे याबाबत उत्तम मार्गदर्शन केले आणि सर्व लहान मुलांची आरोग्य तपासणी केली. यावेळी आरोग्य शिबिरात गावातील एकूण १२७ लहान मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
मोफत आरोग्य तपासणी दरम्यान संत श्री सखाराम महाराज संस्थानचे आचार्य ह.भ.प. तुकाराम महाराज, माजी पंचायत समिती सदस्य श्री.सुनील मोरखडे, संत श्री सखाराम महाराज संस्थानचे दिवाणजी भीमराव बाप्पू माळी, गावातील शाळेचे मुख्याध्यापक बावस्कर सर, रामेश्वर तिजारे, राजूभाऊ पाटील सित्रे, उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेच्या द्वारे आयोजित मोफत आरोग्य शिबिरामध्ये गावातील सर्व लहान मुलांना मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक, कृषी महाविद्यालयाचे रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.अविनाश आटोळे, उद्यानविद्या महाविद्यालयाचे रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ.अनिकेत उमाळे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.दत्ता तायडे तसेच महाविद्यालयातील प्रा.प्रमोद डव्हळे, प्रा.अमोल सौदागर, प्रा.कु.सोनाली चव्हाण, प्रा.कु.निकी बनसोड, प्रा.कु.मोहिनी सिरसाट यांनी अथक परिश्रम घेतले आणि महाविद्यालयाच्या वतीने सर्व आरोग्यतज्ञांचे आभार मानले.
0 Comments