Advertisement

राहुल गांधींवरील आक्षेपार्य विधाना बाबत समाधान दामधर यांच्या फिर्यादीवरून आ. गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

*राहुल गांधींवरील आक्षेपार्य विधाना बाबत समाधान दामधर यांच्या फिर्यादीवरून आ. गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल*


बुलढाणा, 16 सप्टेंबर : अखेर आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार तासापेक्षा अधिक ठिय्या आंदोलन दिल्यानंतर पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेत काँग्रेसच्या आंदोलनाला विराम देण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर यांनी पोलिस निरीक्षक श्री ठाकरे यांना "मा. मुख्यमंत्री बाबत असेच विधान केले तर एफ आय आर दाखल करण्यास आशीच टाळाटाळ कराल का ?" असा संतप्त प्रश्न केला.
अखेर एफ आय आर ची कॉपी हातात घेऊन मध्यप्रदेशचे माजी आमदार तसेच काँग्रेस चे विदर्भ प्रभारी कुणाल चौधरी यांनी जय संविधान म्हणत ठिय्या आंदोलन थांबविले. कलम 351(2), 351(3), 351(4) व 192 अंतर्गत आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   गुन्हा दाखल झाला आहे परंतु आमदार संजय गायकवाड यांना अटक करण्यात आली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या हस्त दौऱ्याच्या दिवशी काँग्रेसचा एक एक कार्यकर्ता घरातून बाहेर पडेल आणि आंदोलन करेल ", असा इशारा अ. भा. काँग्रेसचे युवा नेते कुणाल चौधरी यांनी मीडिया प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटून आणणाऱ्यास अकरा लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे वादग्रस्त विधान आमदार संजय गायकवाड यांनी केल्यानंतर काँग्रेसने सदर आंदोलन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, विदर्भ प्रभारी कुणाल चौधरी, पंचायत राज चे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आ. राजेश एकडे, दिलीपकुमार सानंदा, श्याम उमाळकर, जयश्रीताई शेळके, संजय राठोड, विजय अंभोरे, लक्ष्मण घुमरे, स्वातीताई वाकेकर, प्रकाश पाटील, एम. आसिफ इक्बाल, ऍड. भालेराव, प्रमोद पाटील, धनंजय देशमुख अविनाश उमरकर, राजेश वानखडे, राजेश्वर देशमुख, श्याम डाबरे, पांडव गुरुजी, मोहन रंदले, गजानन ढगे, हरीश रावळ, निलेश पौलझगडे, शलोकानंद डांगे, यांसह काँगेस पदाधिकारी व शेकडो काँगेस कार्यकर्ते उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments