Advertisement

27.06.2025रोजी समाजवादी पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी जलगांव जामोद याना निवेदन

आज दिनांक 27.06.2025रोजी समाजवादी पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी जलगांव जामोद याना महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोग यांनी दिलेल्या न.प. च्या प्रभाग रचना जळगांव जामोद न.प.च्या प्रभाग रचना समिती सदस्यांनी सत्ताधारी पक्षाच्या दबावात येवून व पैशे खावून सन २०२२ ची जुनी प्रभाग रचना कायम ठेवल्याबाबत कार्यवाही होणे बाबत. निवेदन देन्यात आले महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोग यांनी दिलेल्या न.प. च्या प्रभाग रचना जळगांव जामोद न.प.च्या प्रभाग रचना समिती सदस्यांनी सत्ताधारी पक्षाच्या दबावात येवून व पैशे खावून सन २०२२ ची जुनी प्रभाग रचना कायम ठेवल्याबाबत कार्यवाही होणे बाबत.
महोदय,
महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाने महाराष्ट्रातील होवू घातलेल्या सन २०२५ च्या नगर परिषद निवडणुक संदर्भामध्ये नगर परिषद मधील प्रमुख व जबाबदार कर्मचा-यांकडून जळगांव जामोद शहराची प्रत्येक वार्डाची प्रभाग रचना करण्यासंदर्भात समिती गठीत करून नवीन प्रभाग रचना राज्य निवडणुक आयोगाच्या नियमाप्रमाणे करावी असे आदेश असतांना सूध्दा जळगांव जामोद न.प.च्या प्रभाग रचना समिती प्रमुख व त्यांचे इतर पाच सदस्य सहकारी यांनी जळगांव जामोद शहरातील सत्ताधारी पक्षाच्या दादाकडून सन २०२२ ची प्रभाग रचना कायम ठेवतो म्हणून माझे माहीतीप्रमाणे समिती सदस्यांनी अंबाचेलखाची खंडणी घेवून नवीन प्रभाग रचना न करता सन २०२२ ची जुनी प्रभाग रचना कायम ठेवून निवडणुक आयोगाची व नागरिकांची दिशाभूल करीत आहे सन २०२२ च्या चुकीच्या प्रभाग रचनेवर जळगांव जामोद शहरातील अनेक राजकीय पक्षाच्या व माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष यांनी अनेक आक्षेप घेतलेले आहेत परंतू त्यावेळेस निवडणुक स्थगीत झाल्याने आक्षेपाची सुनावणी घेण्यात आली नाही परंतू सुप्रिम कोर्टाचे आदेशाने ओबीसीचा प्रश्न निकाली न निघाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नगर परिषदेच्या निवडणुका स्थगीत ठेवण्यात आल्या होत्या परंतू सुप्रिम कोर्टाने २०१७ च्या प्रभाग व आरक्षणानूसार निवडणुका घ्या असे निवडणुक आयोग व राज्यशासनास आदेशदिल्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया सूरू झालेली आहे परंतू न.प. जळगांव जामोद ने जुनीच प्रभाग रचना कायम ठेवून राज्य निवडणुक आयोगाची दिशाभूल केली आहे कारण सन २०१७ च्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला प्रभाग रचनेमध्ये ५० टक्केच मताधिक्य मिळाले आहे व ५० टक्के विरोधी पक्षाला मिळाले त्यामुळे सत्ताधारी पक्षाने न.प. च्या प्रभाग रचनेचे प्रमुख व इतर सदस्यांना लाच देवून जुनीच प्रभाग रचना २०२२ ची कायम ठेवली आहे व नवीन प्रभाग रचना संबंधी जळगाव शहरामध्ये ते फिरलेले नाहीत. त्यामुळे वरील गंभीर प्रकरणाची तीन दिवसाचे आत दखल घेवून संबंधीत प्रभाग समितीचे समितीप्रमुख व सदस्यांना निलंबीत करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल त्याची संपुर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील
तेथे महाराष्ट्र प्रदेश सचिव लियाकत, खान बुलढाणा जिला अध्यक्ष सैय्यद नफीस ,तालुका अध्यक्ष मुश्ताक जमादार, रिजवान काजी, व शेकड़ो समाजवादी कार्यकर्त उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments