सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी जळगाव जामोद येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज उत्साहात पार पडला
दि. २८ जून – जळगाव जामोद येथील सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी मध्ये NEET JEE MHTCET गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दिमाखात पार पडला.
शैक्षणिक वर्ष 2023-2025 मध्ये जळगाव जामोद सारख्या ग्रामीण भागामध्ये NEET JEE MHTCET मध्ये उज्वल यश संपादन करून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याप्रसंगी जळगाव जामोद मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय संजय कुटे, जळगाव जामोद येथील गटशिक्षण अधिकारी श्री वामनजी फंड साहेब, डॉक्टर सतीशजी शिरेकर, संत तुकाराम पतसंस्थेचे अध्यक्ष श्री रघुनाथ कौलकर सर, संत तुकाराम पतसंस्थेचे सचिव श्री सोपान गुंड सर उपस्थित होते.
याप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
याप्रसंगी संजय जी कुठे साहेबांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि येणाऱ्या दिवसांमध्ये वाढता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी सपोर्ट सिस्टीम आहे मानवासाठी
यावर मोलाचे मार्गदर्शन केले...
जळगाव जामोद येथील गटशिक्षण अधिकारी श्री वामन फंड यांनी त्यांच्या सामाजिक शैक्षणिक जीवनामध्ये कसा समतोल राखावा आणि शासनाच्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजना सुविधा यावर विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचा गुण गौरव केला.
श्री रघुनाथ कोळकर सर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात विज्ञानाला अनुसरून कशी चिकित्सकृती ठेवावी यावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी पालकांशी संवाद साधला
श्री सोपान गोम सर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील अडचणींवर मात कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले.
मान्यवरांनी आपल्या भाषणात सिद्धिविनायक सायन्स अकॅडमीच्या प्राध्यापकांनी निलेश वाघमारे सर, अविनाश देशमुख सर, गोपाल गायकी सर, आणि अजय वानखडे सर यांनी घेतलेले विद्यार्थ्यांवर अथक परिश्रम आणि विद्यार्थ्यांनी मिळवलेले उत्कृष्ट गुण यांचे कौतुक केले व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम उपस्थित विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी प्रेरणादायी ठरला एवढे मात्र खरे
0 Comments