नुकतेच वडशिंगी गावात राहायला आलेले लोहार समाजातील स्वाती
आई-वडिलांपासून लहानपणीच पोरकी झालेली शिक्षणाचा कुठलाही गंध नाही ,कधी शाळाच पाहिली नाही,भटकंतीचेजीवनआई-वडिलांनंतर पोटाची खळगी भरत भटकंती करत आजी आजोबा यांनी सांभाळले. अशी अंदाजे तेरा वर्षाची स्वाती,एक निराधार मुलगी शाळेत शिकण्याचे वय असताना कुठलाही कागद पुरावा नसल्याने भटकंतीचे जीवन जगत असताना एका गुरुजीची नजर स्वातीवर पडली.विचारपूस केली असता सर्व हकीकत लक्षात घेऊन गुरुजींनी गुरुपौर्णिमेला स्वातीला गुरुचे शाळेचे छत्र देऊन जिल्हा परिषद हायस्कूल वडशिंगी पंचायत समिती जळगाव जामोद येथे दाखल करून घेतले. स्वातीची परिस्थिती लक्षात घेऊन सर्वांचे मन हेलावून गेले शाळेचे मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षक यांनी स्वातीची यथोचित स्वागत करून तिला शाळेची पाठ्यपुस्तके, गणवेश, दप्तर व शाळेसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्याची पूर्तता करून शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणले.
बेटी बचाव बेटी पढाव ही म्हण गुरुपौर्णिमेला गुरूंनी प्रत्यक्षात आणण्याचा सर्वांना सार्थ अभिमान वाटला पाहिजे असे कृती या ठिकाणी केली.
0 Comments