Advertisement

पळशी येथिल जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांचे रिक्त पदे भरण्याची गावकऱ्यांची मागणी

पळशी येथिल जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांचे रिक्त पदे भरण्याची गावकऱ्यांची मागणी

आज दिनांक आठ जुलै 2025 रोजी पळशी झाशी येथील नागरिकांनी गटशिक्षणाधिकारी मा. माधवजी पायघन साहेब, पंचायत समिती संग्रामपूर यांना लेखी निवेदन दिले आहे. निवेदनात  म्हटले आहे की पळशी झाशी येथील मराठी पूर्व उच्च माध्यमिक शाळा (जिल्हा परिषद) पळशी झा.येथील मुख्याध्यापक व शिक्षक यांचे पद रिक्त आहेत. हे पद रिक्त असल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आमच्या गावाच्या शाळेतील एक ते सात वर्ग असून सहाच शिक्षक आहेत व शाळेला मुख्याध्यापक नाहीत आज रोजी एक शिक्षक व एक मुख्याध्यापक हे पद रिक्त आहे तरी आमच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे तरी शाळेला मुख्याध्यापक व शिक्षक देण्यात यावे. आमची शाळा माझी सुंदर शाळा या कार्यक्रमांतर्गत तालुक्यातून प्रथम क्रमांक आला आहे त्यामुळे शिक्षणाअभावी आमच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आपण आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर आम्हाला लोकशाही मार्गाने आपल्या पंचायत समिती कार्यालयामध्ये आम्हाला नाईलाजास्तव मुलांची शाळा भरवावी लागेल, या आंदोलनात गावातील विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समितीसह मुलांचे पालक, माता व गावातील नागरिक हे लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी प्रशासनाला पळशी झाशी गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी पळशी गावच्या सरपंच प्रियंका मेटांगे, तंटामुक्ती अध्यक्ष संजय मारोडे, अभयसिंह मारोडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निकिता गिरी, उपाध्यक्ष मुक्ता चितोडे, नलीनीआढाव, सुजित बांगर, बाळू भाऊ साबे,अशोक भिवटे, विशाल बांगर, गोपाल मारोडे,सुमेध गवई, राहूल दामले,अनिल शिरसोले, अविनाश देशमुख, विजय ठाकरे, गोपाल दोरकर,सतीश पाटकर,वैभव मानकर,जितेंद्र बांगर,प्रकाश काळे,विलास मारोडे, राजू आवचार, विठ्ठल रोहनकार, संजय खोट्टे, पांडुरंग चितोडे, राजेंद्र ठाकरे, राहुल साबे, गोपाल पाचपोर, प्रफुल मारोडे,अमित मारोडे, वैभव तायडे, रोशन थुओंकार, अमोल मारोडे, गजानन अहिर ज्ञानेश्वर घाटे, भास्कर शिरसोले मोहन उगले, विजय धरमकार, दीपक दाने, प्रफुल थुओं, शालिग्राम बंनतकर, पांडुरंग बनतकार, तीरतसिंग सोळंके, नरेंद्र रायलकर इत्यादी नागरिकांच्या सह्या होत्या.

Post a Comment

0 Comments