Advertisement

गावकऱ्यांच्या समस्यांचे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन..!

*!! ..गावकऱ्यांच्या समस्यांचे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन..!!* 
डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ संलग्नित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय जळगाव ( जामोद ) येथील सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत   मिळालेले गाव मडाखेड  ( खुर्द ) येथे गावकऱ्यांच्या मूलभूत गरजा जाणून घेतल्या .

जसे की गावात येणारे पिण्याचे पाणी, रस्ते ,शेती विषयक सर्व महत्त्वाच्या बाबी , केंद्रीय सरकारच्या विविध शेती पूरक योजना कितपत याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यावर भविष्यात केल्या जाणाऱ्या उपाययोजना ह्या गावकऱ्यांना पटवून दिल्या आणि एक दुवा म्हणून कृषी विद्यापीठ आणि गावकरी व शेतकरी यांच्यात संवाद साधण्याचे काम केले. 

गावकऱ्यांच्या विविध मूलभूत गरजा यावर उपाययोजना करण्यासाठी सर्व गावकरी मिळून गटचर्चा करण्यात आली आणि तेथे बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांच्या शेती करताना येणाऱ्या समस्या ह्या स्पष्टपणे विद्यार्थ्यांना कळविल्यात. 
 गट चर्चा ही सरपंच सौ.नूतन जवंजाळ आणि उपसरपंच तसेच गावकरी , कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री मा.योगेश गवई सर व कृषी कार्यानुभव उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री अविनाश अटोले सर यांच्या उपस्थितीत पार पडली.

 तसेच या कार्यक्रमाचे आयोजक कृषी दूत उद्धव वावगे, दिपक हरणे, गौरव पाचपोर, प्रणव फुसे, सार्थक वानखडे, शशांक ढोले यांनी त्यांचा सक्रिय सहभाग दर्शविला. आणि यशस्वीपणे ह्या गावकऱ्यांच्या बाबी कृषी विद्यापीठाकडे पोहोचवल्यात. यातूनच विद्यार्थ्यांना यशस्वी कृषी कार्यानुभावाची वाव मिळाली...!!

Post a Comment

0 Comments