Advertisement

वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग यांच्या नेतृत्वात संग्रामपूर येथे जनसुरक्षा विधेयक व विविध विषयावर निवेदन देण्यात आले

*वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग यांच्या नेतृत्वात संग्रामपूर येथे जनसुरक्षा विधेयक व विविध विषयावर निवेदन देण्यात आले तसेच तालुका व शहर कार्यकारिणीसाठी अर्ज स्वीकारण्यात आले*
          
दिनांक 21 7 2025 रोजी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने संग्रामपूर येथे राज्यपाल यांना तहसीलदार यांच्या मार्फत पुढील मागण्यासाठी निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने पुढील मागण्या होत्या
*मागण्या*:1) जन सुरक्षा विधेयक कायदा रद्द करणे बाबत
2)अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती च्या निधी संदर्भात श्वेतपत्रिका काढावी तसेच सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र कुठेही वापरला जाऊ नये म्हणून कायदा करण्यात यावा
3) ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशव्या कोणत्या कारणामुळे काढल्या त्याची चौकशी करणे बाबत. 
4) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आश्चर्यकारक 76 लाख मतदान कुठून आले याचा डेटा निवडणूक आयोगाने द्यावा
 वरील सर्व मागण्या त्वरित मान्य कराव्या अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीला तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला यावेळी निवेदनावर प्रामुख्याने खालील सह्या होत्या 
त्यानंतर तालुका आणि शहर शाखेसाठी महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले तसेच नीताताई मुंडे ह्या सरपंच संघटनेच्या अध्यक्ष झाल्या म्हणून त्यांचा सत्कार विशाखाताई सावंग यांच्या हस्ते करण्यात आला तसेच श्रीकृष्ण भालतडक यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचा सुद्धा स्वागत विशाखा ताई सावंग यांच्या हस्ते करण्यात आले तसेच रवींद्र भेलके यांनी प्रास्ताविक सादर केले आणि वसूलकार काका, मिलिंद वानखेडे, सुमनबाई थाटे,  विशाखाताई सावंग, यांचे मार्गदर्शन झाले सूत्रसंचालन आशिष धुंदडे यांनी केले खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निवेदन देण्यात आले व बैठक पार पडली
यावेळी खालील उपस्थिती होती विशाखाताई सावंग जिल्हाध्यक्ष, रवींद्र भेलके तालुका अध्यक्ष, सुमनबाई थाटे जिल्हा उपाध्यक्ष, आशिष धुंदळे युवा तालुकाध्यक्ष, आत्माराम वसुलकर काका जिल्हा उपाध्यक्ष, संजय इंगळे जिल्हा उपाध्यक्ष, किशोर भिडे युवा नेते, मिलिंद वानखेडे जिल्हा संघटक भारतीय बौद्ध महासभा, भाऊराव गवांदे माजी तालुकाध्यक्ष, नीता पुंडे, भाग्यश्री सोनवणे, मनोरमा सावदेकर, पद्मिनी कांबळे, छाया बोदडे,जिजाबाई वानखेडे, राजकन्या वानखेडे, कल्पना धुंधळे, निर्मला घुले, संगीता इंगळे, निर्मला घुले, नंदकिशोर पुंडे, राहुल भिलंगे,देविदास सारसर, रत्नाकर भिलंगे, श्रीकृष्ण भालतडक, संजय वानखेडे, साहेबराव भगत, श्रीकृष्ण खंडेराव, निलेश लहासे, लक्ष्मण सपकाळ, परशुराम वानखेडे, उज्वला वाघ, सुनीता भगत, पिंकी तायडे, कमला तायडे, बेबीबाई वाघ, विमलबाई वाघ, शिलाबाई इंगळे, दीपक पहुरकर, राहुल नितोने व संख्या महिला आणि पुरुष यावेळी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments