Advertisement

भारतीय बौद्ध महासभेची ग्राम कोद्री येथे नवीन कार्यकारणी गठित

भारतीय बौद्ध महासभेची ग्राम कोद्री येथे नवीन कार्यकारणी गठित 

संग्रामपूर :  तालुक्याच्या वतीने दि 07 जुलै 2025 सोमवार रोजी कोद्री  येथे भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा गठित करण्यात आली. यावेळी कार्यक्रम उपस्थित भारतीय बौद्ध महासभा चे तालुका शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्ष स्थानी आद.बौद्धाचार्य.प्रा.ॲड. ए.एच.खंडेराव सर तालुका अध्यक्ष संग्रामपूर हे होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन आद. बौद्धाचार्य मिलिंद वानखडे तालुका सरचटणीस  यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापक  आद. आयु. रत्नदीप  खंडेराव  संरक्षण तालुका उपाध्यक्ष यांनी केले. आयु. उदेभान  दांडगे साहेब  (संस्कार  उपाध्यक्ष), आयु. नारायण वानखडे सर.(संस्कार सचिव), आयु. राहुल नितोने सर (कार्यालयीन सचिव), आयु. बाबूलाल वानखडे (प्रचार व पर्यटन सचिव), आयु. भीमराव पहुरकर सर (संघटक), आयु. प्रशांत  तायडे सर (संघटक), आयु. शेषराव  वानखडे (मा. जिल्हा  संघटक), आयु. एम. बी.वानखडे साहेब धम्म प्रचारक, महिला  तालुका अध्यक्षा बबिता वानखडे मॅडम तसेच वंचित बहुजन युवा आघाडी  व समस्त बौध्द उपासक उपासिका सान बालक व बालिका मोठ्या संख्खेने उपस्थित होते. महाकारूणीक तथागत भगवान बुध्दानां  व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार व दिप धुप प्रज्वलित करुण त्रिशरण पंचशील व बुध्द पुजा घेउन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक बाबूलाल वानखडे यांनी केले. त्याच  बरोबर भीमराव  पहुरकर सर यांनी ग्राम शाखा  व बाल संस्कार यावर आपले मनोगत मांडले. तसेच दांडगे साहेब , शेषराव वानखडे साहेब  यांनी सुद्धा ग्रामशेखेचे महत्व समजून सांगितले .आपल्या गावातील उपासक यांना  ग्राम शाखा नूतन कार्यकारणी तील पदाधिकारी यांना पुष्प हार व पुष्प न  देता वंदनेचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. भारतीय बौद्ध महा सभा तालुका शाखा संग्रामपूर पदाधिकारी यांनी धम्मातील महत्व आणी आचरणा वर प्रवचन दीले. प्रा. ॲड ए.एच.खंडेराव तालुका अध्यक्ष यांनी भारतीय बौद्ध महा सभेचे कार्य आणी भगवान बुध्दांनी दीलेल्या धम्माचे आपल्या जीवनातील महत्व त्याच बरोबर वर्षावास आणि  त्याचे महत्त्व उपस्थित धम्म बांधव आणि भगिनी यांना समजावून सांगीतले व कोद्री येथील ग्राम शाखा नुतन कार्यकारणी गठीत उत्तम रित्या संपन्न झाली. शेवटी  सरणत्त  गाथा घेऊन उपस्थित सर्वांच्या समोर सांगता झाली.

Post a Comment

0 Comments