Advertisement

राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्कार पळशी झाशी येथील सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे यांना प्रदान

राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्कार  पळशी झाशी येथील सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे  यांना प्रदान 
लोणावळा येथे अखिल भारतीय सरपंच परिषद व जयंतराव पाटील मित्रमंडळ, कुर्डू यांच्या संयुक्तविद्यमाने ग्रामरत्न सरपंच पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.


 या सोहळ्यात लोणावळा येथे अखिल भारतीय सरपंच परिषद द्वारा आयोजित ग्रामरत्न सरपंच पुरस्कार  संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे यांना प्रदान करण्यात आला.

 या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,यशदाचे माजी महासंचालक
 तथा माजी विभागीय आयुक्त 
चंद्रकांत दळवी,प्रसिद्ध इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे,अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील,उपाध्यक्ष शशिकांत मोरे,अ.भा.सरपंच परिषद राज्य कार्यकारिणी सदस्य संजय कांबळे,अ.भा.सरपंच परिषद पुणे महिला जिल्हाप्रमुख उज्वला गोकुळे,अ.भा.सरपंच परिषद उत्तर पुणे जिल्हा प्रमुख बापूसाहेब काळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

पुरस्कार मिळाल्यानंतर सरपंच सौ प्रियंका मेटांगे यांनी आयोजकांचे आभार मानताना मिळालेला पुरस्कार हा गावकरी व नेहमी सहकार्य करणारे, सचिव हेमंत बापू देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, नेहमी सहकार्य करणारी मित्र मंडळी, शाळेमधील सर्व सहकारी, व सर्व गावकरी मंडळी यांच्या सहकार्यामुळेच मिळाला असे सांगितले 
     आपल्या कामाच्या भरोशावर यापूर्वीही सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे यांना राज्यस्तरीय कृषी माऊली पुरस्कार नाशिक येथे मिळाला आहे, तसेच लोकमतचा लोकमत अवार्ड  जिल्हास्तरीय पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे, त्याप्रमाणेच गावकऱ्यांनी सुद्धा जवळपास 20 ठिकाणी सरपंचांचे शाल श्रीफळ साडी देऊन सत्कार केले आहेत हे विशेष.

Post a Comment

0 Comments