Advertisement

पळशी झाशी गावामध्ये बऱ्याच वर्षानंतर सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे यांच्या पुढाकाराने व गावकऱ्यांच्या सहकार्याने धावली लालपरी

संग्रामपूर, बुलडाणा 

दिनांक, 6/8/2025

पळशी झाशी गावामध्ये बऱ्याच वर्षानंतर सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे यांच्या पुढाकाराने व गावकऱ्यांच्या सहकार्याने धावली लालपरी

      पळशी झाशी गावामध्ये जवळपास पाच ते साडेपाच हजार लोकसंख्या असून गावात श्री शंकरगिरी महाराजांचे खूप मोठे मंदिर आहे, तसेच गावातून बाहेरगावी जाणारी विद्यार्थी दवाखान्यात जाणारे गावकरी, आणि सर्वच नागरिकांना बाहेरगावी जाण्यासाठी खूप त्रास होत होता, त्यामुळे सरपंच सौ.प्रियांका मेटांगे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून गावात कित्येक वर्षापासून बस सेवा सुरू केली. त्यासाठी गावकऱ्यांनी सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली गावातील, ओंकार भाऊ दोरकर, सुरेश भाऊ हेलगे, श्रीराम भाऊ बानाईत, गजानन भाऊ थुओकार, यांनीही मागणी मोठ्या प्रमाणात रेटून धरली, व चांगल्या प्रकारे सहकार्य केले, त्याचप्रमाणे गावातील एसटी महामंडळामध्ये कार्यरत असणारे सागर भाऊ कोठे यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करून आज रोजी गावात बस सेवा सुरू झाली त्याबद्दल सरपंच यांनी सर्व मंडळींचे व गावकऱ्यांचे आभार मानले, 

   गावात बस आली असता सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे, उपसरपंच, पंचफुलाबाई पवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व गावकरी मंडळी यांच्या हस्ते बस चालक श्री. गजानन भाऊ मेटांगे, वाहक श्री. एस एन डाबेराव, तसेच दुसऱ्या बसचे चालक आसिफ भाई कुरेशी, तर वाहक अब्दुल भाई मतीन, यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले, तसेच गावातील बस सेवा सुरू करण्यासाठी मेहनत घेणारे ओंकार भाऊ दोरकर, सुरेश भाऊ हेलगे, श्रीराम भाऊ बानाईत, गजानन भाऊ थुओकार, यांचे सुद्धा स्वागत गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले. 
     गावामध्ये बऱ्याच वर्षानंतर बस सेवा सुरू झाल्या मुळे सर्व विद्यार्थी, महिला वर्ग, वृद्ध मंडळी, व गावकरी मंडळी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यावेळी गावातील 200 ते 300 गावकरी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते.

गाव माझा न्युज चॅनल करिता राजेंद्र ससाणे ची बातमी 

संग्रामपूर, बुलडाणा

Post a Comment

0 Comments