माणुसकीला काळीमा फासणारी घटना ?
दीड वर्षाच्या मुलीवर अत्याचार जळगांव जामोद हादरले
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात विकृतीलाही लाजवेल अशी घटना घडली आहे 55 वर्षेय ईसमाने तब्बल 16 महिन्याचे लहान चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना दीनांक 5 आगस्ट च्या सकाळी 10.30 ते 11च्या दरम्यान घडली आहे या घटनेने जळगाव जामोद हादरले असुन मानुसकिला काळीमा फासणारी अशी घटना घडल्याने समाजमन सुन्न झाले आहे 1 वर्ष 6 महिन्याच्या चीमुरडीला आंबा खायला देतो म्हणून आरोपी मधुकर पुंजाजी हागे यांने चिमूरडीला घरी नेले होते अर्ध्या तासानंतर चिमूरडी रडत होते त्यामुळे पीडित चिमुरडीच्या आईने तीला जवळ घेऊन पाहीले त्यावेळी तिच्या शरीरावर रक्ताच्या डाग दिसल्याने निरखून पाहिले असता चीमुरडीवर गैरकुत्य झाल्यचे लक्षात आल्यानंतर पिडीत चीमुरडीच्या आईने घरच्यांना सांगितले त्यामुळे त्यानी पोलीस स्टेशन गाठले व घडलेल्या घटनेची तक्रार दील्याने अश्लील कुत्य करणार्या आरोपी मधुकर पुंजाजी हागे यांचे विरोधात अप क्र 373/2025कलम64(1)65(2) भारतीय न्याय सहकलम 4/8/12पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून गावातील वातावरण खराब होऊ नये गावात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी म्हणून ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी तात्काळ कार्यवाही करून पोलीस नाईक इरफान शेख व पोलीस कॉन्स्टेबल संदीप रिंढे यांचे समावेश काही कर्मचाऱ्यांना पाठवून आरोपी मधुकर पुंजाजी हागे यास अटक केली आहे घटनेचा पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोळ करीत आहेत
0 Comments