Advertisement

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली शाखा बुलडाणा यांच्या द्वारा ९ आगस्त जागतिक आदिवासी दीन साजरा

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली शाखा बुलडाणा 
यांच्या द्वारा ९ आगस्त जागतिक आदिवासी दीन साजरा 
निवाणा ता, संग्रामपूर जिल्हा बुलडाणा 
येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते 
कार्यक्रमाचे अधयक्षस्थानी सचिन भाऊ पालकर 
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उखरडा भाऊ सोळंके होते 

आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते 
मान्यवरांचया हस्ते रुक्ष लागवड करण्यात आली तसेच
आदिवासी विद्यार्थ्यांना लेटर वही, पेन साहित्य वाटप करण्यात आले 
कार्यक्रमात बोलताना जिल्हा अध्यक्ष सोपान सोळंके यांनी आदिवासी दिनाचे महत्त्व समजाऊन सागीतले
आदिवासी समाजावर होणारे अत्याचार, सरकारचे धोरण, शिक्षण, आरोग्य, रोजगार, तसेच 
आदिवासी समाजाची परंपरा, भाषा, साहित्य, यांची माहिती इतरांना कळावी, त्यांचे जीवन कळावे म्हणून जागतिक संघटनेने ९आगस्ट हा जागतिक आदिवासी दीन म्हणून साजरा करतात असे प्रतिपादन जिल्हा अध्यक्ष सोपान सोळंके यांनी केले 
राजेश्वर देशमुख साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले 
तामगाव पोलीस अधिकारी सोनुने साहेब यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले 
हुसेन पालकर, संगीताताई  बारेला, सरदार अवासे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन भाऊ पालकर, उखरडाभाऊ सोळंके, रामेश्वर भाऊ गायकी जेष्ठ पत्रकार यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले 
कार्यक्रमाला सूर्यभान राठोड, भगवान भाऊ पवार, मंगलासिंग माणिकराव पवार,राजूभाऊ पवार, अमोल राठोड, गोपाल चव्हाण, निलेश पवार, रणजित डाबेराव , अंबादास चव्हाण, रमेश सोळंके, राजेश आवसे, सरदार अवासे, बाळू डाबेराव, गजानन डाबेराव, रत्नाकर भिलंगे, पोलीस खुपीया विभागाचे मनीष वानखडे, अजित डाबेराव, व निवांना चे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व महाराणा प्रताप मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचेसह  समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,

गाव माझा न्युज चॅनल करिता राजेंद्र ससाणे ची बातमी 
जळगाव जा बुलढाणा

Post a Comment

0 Comments