Advertisement

राशनचा काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा तांदुळ ट्रकसह पकडला..42,92,200/-रु.चा मुद्देमाल हस्तगत...

*काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा राशनचा तांदुळ ट्रकसह पकडला..42,92,200/-रु.चा मुद्देमाल हस्तगत...

जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालि अंतर्गत सामान्य, गरजु, गरीव नागरीकांना वितरीत होणारा तांदुळ तसेच इंतर धान्याची काळ्या बाजारात होत असलेली चोरटी वाहतूक आणि विक्री थांबवून, अशा घटनांना प्रतिबंध करुन, यामध्ये सहभागी ईसमांचा शोध घेवुन, त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी  पो.स्टे. जळगांव जामोद हद्दीत स्थागुशाचे पथकाने दि.28/09/2025 रोजी अत्यावश्यक वस्तु अधिनयम अंतर्गत कारवाई केली. दि.28/09/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, ट्रकमध्ये शासनाचे सार्वजनिक वितरण प्रणालि अंतर्गत गरजु, गरीब व सामान्य नागरीकांना वितरीत होणारा तांदुळ वाळगून, त्याची काळ्या बाजारामध्ये चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ट्रकमध्ये तांदुळ जात आहे. या माहितीवरुन स्था.गु.शा.च्या पथकाने जळगांव जामोद ते नांदुरा रोड वरील गोळेगांव फाट्यावर सापळा रचून, माहिती प्रमाणे ट्रकला चालकासह पकडून कारवाई केली. सदर कारवाईमध्ये वाहन चालक याचे ताव्यातून ट्रक क्रं. GJ 03 CU 2282 मध्ये 240 क्विटल कि.6.79,800/- रु.चा सार्वजनिक वितरण प्रणालीचा तांदुळ हस्तगत करण्यात आला. ट्रक चालक यास तांदुळ कोठुन आणला याबाबत विचारणा केली,त्यांनी सदरचा तांदुळ हा कुरणगाड बु. येथील विष्णु वाबाराव आटोळे यांचे गोडावुन मधुन भरुन आणलेला आहे वरुन सदर गोडावुनचे ठिकाणी जावुन पाहिले असता. गोडावुन मध्ये 344 क्विटल तांदुळ कि.10.32.000/- रु चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला तसेच तांदुळ मोजण्याकरीता वापरण्यात येणारे वजन काटे, पोते शिलाई मशीन व इतर साहित्य कि.40.200/- रु असा एकुण 10.72.200/- रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ट्रक मधील व गोडावुन मधील असा एकुण 584 क्विटल तांदुळ कि. 17.52.000/- रु चा हस्तगत करण्यात आला आहे.या कारवाईत 1. भटटी कादर कासम, वय 55 वर्षे रा. अरव शेरी मालीया जि. राजकोट, गुजरात राज्य.2. वैभव सुनिल आटोळे, वय 25 वर्ष, रा. कुरणगाड ता. जळगांव जामोद जि. बुलढाणा,3. अंकुश किसन आटोळे, वय 22 वर्ष रा. कुरणगाड ता. जळगांव जामोद जि. बुलढाणा यांच्या ताब्यातुन 1) तांदुळ 584 क्विटल किं. 17,52,000/-रु., ट्रक क्रं. GJ 03 - CU 2282 किं. 25,00,000/-रु., एकूण- 42,92,200/-रु.चा मुद्देमाल 
सदरची कारवाई मा. श्री. निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये तर अमोल गायकवाड-अपर पोलीस अधीक्षक- बुलढाणा,श्रेणीक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक, खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.सुनिल अंबुलकर स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांचे नेतृत्वात पोउपनि. प्रताप बाजड, पोहेकॉ. राजेंद्र टेकाळे. पोहेकॉ. जगदेव टेकाळे, पोकॉ. अमोल शेजोळ, मंगेश सनगाळे, निलेश राजपुत, चापोहेकॉ. विकास देशमुख स्था.गु.शा. बुलढाणा यांचे पथकाने केली.

Post a Comment

0 Comments