दिनांक १७ सप्टेंबर पासून धनगर जमातीला अनु जमातीच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी अनु जमातीच्या यादीतील अनु ३६ वर धनगड ऐवजी धनगर वाचावे व धनगर जमातीला अनु जमातीचे प्रमाणपत्र तात्काळ निर्गमित करावे या साठी जालना येथे आरक्षण योद्धा मा दिपकभाऊ बोऱ्हाडे हे आमरण उपोषणास बसले असून
२० तारखेला अकोला जिल्ह्यातील सकल धनगर जमातीचे प्रतिनिधी मंडळ जालना येथे उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्ते दिपकभाऊ बो-हाडे यांच्या पाठीशी सर्व धनगर समाज ताकदीने उभा असून आज उपोषणकर्ते यांचे आवाहनानुसार सकल धनगर समाज अकोला जिल्ह्याचे वतीने मा देवेंद्रजी फडणविस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी अकोला यांचे मार्फत निवेदन देऊन सकल धनगर समाजाचा दिपकभाऊ बोऱ्हाडे यांना पाठींबा असून मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ धनगर जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करून धनगर जमातीला अनु जमातीच्या S T प्रमाणपत्र निर्गमित करणे बाबत शासनादेश काढावा व उपोषणकर्ते दिपकभाऊ बोऱ्हाडे यांचे मागणी नुसार धनगर जमातीला न्याय द्यावा असे निवेदन देऊन जर धनगर जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही आणि उपोषणकर्ते दिपकभाऊ बोऱ्हाडे यांचे जिवित्वाचे बरेवाईट झाल्यास धनगर समाज तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातुन देण्यात आला असून २४ सप्टेंबर बुधवारला जालना येथे अकोला जिल्हा व राज्य भरातुन धनगर समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहुन शासनाला धनगर जमातीची ताकद दाखवून द्यावी असा इशारा देण्यात आला निवेदन देण्यासाठी मा ज्ञानेश्वरभाऊ सुलताने मा गटनेता तथा जि प सदस्य, मा पुष्पाताई गुलवाडे माजीनगर सेविका, मा साहेबराव पातोंड विभागीय अध्यक्ष म अ स प्र मंच, मा गोपालभाऊ कोल्हे मा जि प सदस्य, मा गोपालभाऊ गावंडे युवा नेता, मा ज्ञानेश्वर कवळकार, मा रमेशजी उभे जिल्हाध्यक्ष धनगर समाज महासंघ, मा रामदासजी होपळ गुरुजी, मा भाष्करराव पिलात्रे अध्यक्ष जयमल्हार ग्रामिण सह पत संस्था, मा मनोजभाऊु करणकार अध्यक्ष सेवा सह सोसायटी, मा विशालभाऊ दिवनाले युवा नेते, सदानंद कवळकार, विक्की लाखे, कृष्णराव जुमळे, सचिन बचे, संजय गाडगे, दिलीप काळे, मुकुंदराव भदे, नारायणराव भदे, गजाननराव नवलकार, गजाननराव पांडे, किसनराव अकोटकर, बाळकृष्ण तऱ्हाळकर, गजाननराव अकर्ते साहेब से नि BDO, अतुलदादा वसतकार, गणेशराव कवळकार, चैतन्य लाखे, गणेश चिंचोलकार, विठ्ठल मालठाने, यशवंतराव नागे, डॉ संजीव नागे इत्यादी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
0 Comments