दिनांक 15/09/2025 रोजी मिळालेल्या गोपनिय माहिती नुसार कुंवरदेव -2 भागातील राखीव वनात सागवान लाकुड तस्कर करणारे इसम हे अवैधरित्या अपप्रवेश करुन अवैध रित्या सागवान वृक्षांची तोड करत असल्याची माहिती मिळाल्यावरुन संबंधीत वनकर्मचारी हे सदर भागात शोध घेण्यासाठी गेले असता. त्याभागात अवैध वृक्षतोड होत असल्याचा कुन्हाडीचा आवाज आला, आवाज्याच्या दिशेने गेले असता अवैध वृक्षतोड करणारे इसमांनी आम्हाला पाहिले व टेकडीवरुन प्राणघातक हल्ल्याच्या हेतुने तुफान दगडफेक सुरु केली. सदर भागातील घनदाट जंगल व सांयकाळीची वेळ असल्याने त्याठिकाणावरुन आरोपीने पलायन केले. सदर भागात पाहणी केली असता घटनास्थळावरती एक मोबाईल व कुन्हाड मिळून आली. ओळख पटलेल्या आरोपीच्या विरोधात पोलीस स्टेशन जळगांव जामोद येथे गुन्हा नोंद करण्यांत आला. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करुन ओळख पटलेल्या व अज्ञात आरोपीच्या विरोधात वनगुन्हा क्रमांक 09/2025/00681/17024 दिनांक 15/09/2025 रोजी वनगुन्हा जारी करण्यांत आला. त्या राखीव जंगल क्षेत्रात अंदाजे 9 ते 10 इसम त्याभागात जंगल तोड करीत असल्याची माहिती मिळाली.
दिनांक 16/09/2025 रोजी सदर भागाची पाहणी केली असता जागेवरती 31 सागवान वृक्षांची तोड केल्याची दिसून आली. जंगल नुकसानी अंदाजे 250000/- अक्षरी अडीच लाख रुपये झाल्याची दिसून आले, त्यानंतर आरोपीचा शोध घेतला असता दिनांक 20/09/2025 रोजी आरोपी नामे 1) राजाराम नमला किराडया रा. कुंवरदेव, 2) गटुसींग गेंदालाल अलावा रा. कुंवरदेव यांना अटक करुन त्यांच्या विरोधात भारतीय वन अधिनियम 1927 कलम 26 (1), ड,फ 26 (4) व 52 अन्वये वनगुन्हा कायम करण्यांत आला. सदर आरोपी यांना मा. न्यायालय जळगांव जामोद येथे हजर केले असता मा. न्यायालय जळगांव जामोद यांनी दिनांक 25/09/2025 पर्यंत वनकोठडी सुनावली.
दिनांक 22/09/2025 रोजी इतर आरोपीचा शोध घेतला असता आरोपी क्रमांक 1) मालसींग मेहताबसींग अलावा रा. कुंवरदेव, 2) सोभाराम मेहताबसींग अलावा रा कुंवरदेव, 3) लालसींग मेहताबसींग अलावा रा. कुंवरदेव यांना अटक करुन त्यांना मा. न्यायालय जळगांव जामोद येथे हजर केले असता, मा. न्यायालय जळगांव जामोद यांनी दिनांक 25/09/2025 पर्यंत वनकोठडी सुनावली.
सदर तपास मा.सरोज गवस उपवनसंरक्षक (प्रादेशिक) बुलडाणा वनविभाग बुलडाणा व मा. सहाय्यंक वनसंरक्षक श्री. वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी श्री.एन.एन. काळे वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रा). जळगांव जामोद व सहाय्यंक तपास अधिकारी श्री.ए.ए. बडगुजर वनपाल जामोद वर्तुळ हे करत आहे. सदर वनगुन्हयाचा चौकशी कामी कु. रुपाली राऊत वनरक्षक चालठाणा, श्री. राहुल मदन तायडे वनरक्षक कुंवरदेव -2, श्री. प्रज्वंल काळुसे वनरक्षक, श्री. योगेश गांवडे वनरक्षक, श्री एस. आर. सुरन्ते वनरक्षक, श्री. अमोल हिवाळे वनरक्षक . श्री पांडु धांडेकर वनमजुर यांनी तपासाकामी सहकार्य केले. सदर कारवाईमुळे जामोद भागात अवैधरित्या सागवान लाकुड व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणानले असून, पुढील कारवाई मध्ये मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता नाकरता येत नाही.
0 Comments