न्यायपालिका आणि निवडणूक आयोगावर ॲड रोठेंचे गंभीर आरोप..
बुलढाणा :
निवडणुकीच्या अनुषंगाने नियमबाह्य प्रभाग रचनेवरील हरकती नुसार नागपूर उच्च न्यायालयात 17 ऑक्टोंबर ला रिट पिटिशन क्रमांक 6490/25 दाखल करण्यात आलेल्या याचीकेवर 21 नोव्हेंबरला सुनावणी प्रलंबित आहे. तर बुलढाणा शहरातील नियमबाह्य झालेली प्रभाग रचना, त्यावरील घेण्यात आलेली हरकत प्रक्रिया, आणि बुलढाणा विधानसभेच्या वेळी ईव्हीएम वरील आक्षेप प्रलंबित आहेत. असे असताना महाराष्ट्र निवडणूक आयोगाने बुलढाण्यातील नियमबाह्य नगरपरिषद, नगरपंचायती निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे. निवडणूक प्रक्रिया न्यायप्रिय आणि भयमुक्त होण्यासाठी प्रथमता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी. अशी अफलातून मागणी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील यांनी थेट राष्ट्रपती आणि राष्ट्रीय निवडणूक आयोग, महाराष्ट्र निवडणूक आयोग यांच्याकडे केली आहे.
____
22 हजार 300 व्हिडिओ व्हायरल झाल्यावर गुन्हे दाखल नाही..!
महाराष्ट्रात नेपाळची पुनरावृत्ती होण्याची शक्यता..
निवेदनामध्ये प्रामुख्याने बुलढाणा विधानसभेच्या वेळी मी निवडणुकीत नव्या क्रमांकावर असलेल्या शिट्टी निशाणीचे चिन्ह घेऊन निवडणूक लढवीली होती. त्या दरम्यानच्या काळात 22 हजार 300 शीट्टी निशाणीचे बटन दाबताना आणि व्हीव्हीपॅड मधून मतदान होतानाचे जीपीआरएस लोकेशन चे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे. सदर व्हिडिओची चौकशी करून माझ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सुद्धा राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे ऍड रोठेंनी यापूर्वी केलेली आहे. परंतु तरीही त्यावर अद्याप कोणतेही कारवाई करण्यात आली नाही.
तर असंख्य टप्प्यावर बुलढाण्यातील नियमबाह्य झालेली प्रभाग रचना, त्यावरील हरकत प्रक्रिया. यासह कोणतीही मागणी आणि हरकत नसताना बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील 246 अनुसूचित जातीचे मतदार प्रभाग क्रमांक पाच मध्ये नियमबाह्यरित्या टाकण्यात आले आहे. या अनुषंगाने वारंवार कायदेशीर तक्रारी करण्यात आल्या. उच्च न्यायालयात याचिका क्रमांक 64 67 प्रलंबित आहे. असे असतानाही कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे मी एक जबाबदार महाराष्ट्राचा नागरिक म्हणून व्यतित होऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. यावर गांभीर्याने विचार न झाल्यास महाराष्ट्रामध्ये नेपाळची पुनरावृत्ती होण्याची शक्यतांही ॲड. रोठेनी वर्तवली आहे.
_
बुलढाणा
दिनांक : 07/11/2025
0 Comments