Advertisement

प्रगट दिन महोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

प्रगट दिन महोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
*अकोट प्रतिनिधी*

आकोट तालुक्यातील ओळखल्या जाणाऱ्या संत नगरी वरुर जऊळका येथील योग योगेश्वर संस्थान मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. असून १ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी पर्यंत  ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व शिव महापुराण कथा होणार आहे.
 शिव महापुराण कथा वाचक ह.भ.प. श्री गणेश महाराज शेटे आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी व्यासपीठ नेतृत्व ह. भ.प.अवधूत महाराज पारसकर, रामदास महाराज जवंजाळ, वैभव महाराज वसू, विश्वनाथ महाराज गीते, विष्णुपंत कुपटे यांच्या उपस्थितीत होईल,
  त्याचप्रमाणे सप्ताहामध्ये दररोज संध्याकाळी महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार महाराज मंडळींचे कीर्तनाचे आयोजन केले आहे. यामध्ये रामकृष्ण महाराज अंबुसकर, भानुदास महाराज टाकळीकर, अतुल महाराज बोर्डे, नागेश महाराज आगलावे, विष्णू महाराज गावंडे ,मोहन महाराज मेतकर ,बाल कीर्तनकार कु. कृष्णाई पाटील लांजुळकर व ८ फेब्रुवारीला सकाळी श्रींच्या मूर्तीचा अभिषेक काल्याचे किर्तन, महाप्रसाद व श्रींच्या पादुका व मुखवटासह संत नगरी वरुड जऊळका येथून भव्य ग्रंथ दिंडी सोहळा राहील या सर्व कार्यक्रमाचा श्रींच्या भक्तांनी लाभ घ्यावा,असे आवाहन योग योगेश्वर संस्थान संस्थांचे अध्यक्ष ह.भ.प. श्री गणेश महाराज शेटे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments