Advertisement

काँग्रेस व शिवसेना उबाठा चे शेतकऱ्यांसह महावितरण ला दिवसा विद्युत पुरवठा करणे बाबत संयुक्त निवेदन

*काँग्रेस व शिवसेना उबाठा चे शेतकऱ्यांसह महावितरण ला दिवसा विद्युत पुरवठा करणे बाबत संयुक्त निवेदन*
*तहसीलदार यांच्या दुरध्वनी द्वारे उप अभियंता यांना दिवसा विद्युत पुरवठा बाबत सूचना* 
आज बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी सुनगाव, उसरा, चालठाना, जामोद येथे वाघ, अस्वल, तडस, रान डूक्कर या वन्य प्राण्यांचा वावर असल्याने शेतीला दिवसा विद्युत पुरवठा करणे बाबत काँग्रेस व शिवसेना उबाठा चे शेतकऱ्यांसह महावितरण ला संयुक्त निवेदन देण्यात आले.

निवेदनाची दखल घेत माननीय तहसीलदार यांनी दुरध्वनी द्वारे उप अभियंता, महावितरण जळगांव जामोद यांना दिवसा विद्युत पुरवठा बाबत सूचना दिल्या.
सदर निवेदनात नमूद आहे की,
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव, उसरा, चालठाना, जामोद येथे वाघ, अस्वल, रान डूक्कर या वन्य प्राण्यांचा वावर असल्याने शेतीला दिवसा विद्युत पुरवठा द्यावा ही विनंती.
सुनगाव, उसरा, चालठाना, जामोद हि गावे सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने सदर भागातील शेत शिवारात नेहमीच वन्य प्राण्यांचा वावर आढळून येतो. मागील ३ दिवसांपासून सुनगाव चालाठाना परिसरात पट्ट्या वाल्या वाघाचा मुक्त संचार आढळून आला आहे. वन विभागाच्या ड्रोन सर्वेक्षणात सदर वाघाचे छायाचित्र पण टिपल्या गेले आहे.
तसेच मागील आठवड्यात जामोद येथील शेतकरी श्री. रामेश्वर पुंजाजी हिस्सल हे रात्रीला त्यांच्या शेतात पिकला पाणी देत असतांना त्यांचेवर अस्वलाने हल्ला केलेला आहे. सदर अस्वला सोबत पिल्ले  असल्याने ती इतर शेतकऱ्यांना पण धोकादायक आहे.

सुनगाव, उसरा, चालठाना, जामोद परिसरात रान दुक्कारांचा व तडसांचा वावर पण नियमित आढळून आलेला आहे .
वाघ, अस्वल, तडस, रान डुक्कर इत्यादी वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे तसेच संपूर्ण परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून शेतीला रात्री एवजी दिवसा विद्युत पुरवठा होणे गरजेचे आहे. 
तरी सुनगाव, उसरा, चालठाना, जामोद परिसरात शेतीला तत्काळ दिवसा विद्युत पुरवठा करण्यात यावा हि विनंती. विद्युत पुरवठा दिवसा न केल्यास रात्रीच्या विद्युत पुरवठ्या मुळे होणार्या कुठल्याही प्रकारच्या हानीस प्रशासन म्हणून आपण जबाबदार रहाल. तसेच सुनगाव, उसरा, चालठाना, जामोद परिसरात शेतीला तत्काळ दिवसा विद्युत पुरवठा न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.
सदर निवेदनावर समाधान दामधर, शुभम उकरडा सोळंके, रमेश हागे, रवी बानाईत, शेषराव वंडाळे, पुंडलिक पाटील, दिनेश ढगे, अमोल भगत, सुभाष ढगे, विजय वंडाळे, गजानन सोनटक्के, विनोद इंगळे, गजानन दातीर, राजनकर सह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments