*अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या बुलढाणा जिल्हा पुर्व अध्यक्ष पदी राजु घाटे (पाटील) यांची पुन्हा निवड*
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघांची बैठक आज दिनांक १४ फेब्रुवारी 2026शनिवार रोजी जळगांव जामोद येथे संपन्न झाली. सदर बैठक हि संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभिमन्यू भगत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकी मध्ये सर्वानुमते राजु घाटे पाटील यांना बुलढाणा जिल्हा पुर्व अध्यक्ष म्हणून पुन्हा त्यांची निवड करण्यात आली राजु घाटे पाटील यांनी यावेळी जिल्ह्यातील कार्यकारिणी मध्ये काही पत्रकारांच्या नियुक्त्या सुद्धा केल्या.त्या मध्ये जिल्हा कार्याध्यक्ष पदी आश्विन राजपुत जिल्हा व श्रीकृष्ण गावंडे (नांदुरा) ,जिल्हा सचिव पदी संतोष कुलथे ,
जिल्हा उपाध्यक्षपदी प्रकाश खंडागळे ,जिल्हा संपर्कप्रमुख पदी अमोल भगत ,जिल्हा संल्लागार पदी सिध्देश्वर निर्मळ , जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पदी गजानन डाबेराव ,जिल्हा संघटक पदी शेख कदीर तर जळगाव जामोद तालुका अध्यक्ष पदी किशोर दाताळकर यांची सुध्दा फेर नियुक्ती केली. या बैठकीत मंगेश राजनकार , मंगेश बहुरूपी उपस्थित होते. अशी माहिती पत्रकार मंगेश बहुरूपी यांनी दिली.
0 Comments