*ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेतर्फे उपजिल्हाधिकारी (रोहयो) विभाग यांना विविध मागण्यांसाठी दिले निवेदन*
ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेतर्फे उप जिल्हाधिकारी (रोहयो)यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याकरिता निवेदन देण्यात आले असून, त्यात निवेदनात त्यांच्या पुढील सर्व मागण्या मंजूर कराव्यात जसे ३ ऑक्टोंबर 2024 च्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करणे, ग्रामस्तरावर मस्टर काढण्यासाठी युजर आयडी, पासवर्ड मिळावा,ज्या ग्रामपंचायत मध्ये ग्राम रोजगार सहाय्यक नाही तेथे नवीन ग्राम रोजगार सहाय्यकाची नियुक्ती करणे,ग्रामरोजगार सहाय्यक याच्याऐवजी इतर कर्मचारी काम करून आहेत अशा कर्मचाऱ्याऐवजी त्या पदावर ग्राम रोजगार सहाय्यकाची निवड करणे,जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये ग्रामरोजगार सहायकांना कामाचे मानधन दिल्या जात नाही याबाबत योग्य ती कारवाई करणे, राजकीय सुडातून विनाकारण पदावरून कमी केलेल्या ग्रामरोजगार सहायकांना परत पदावर घेणे, राजकीय सूत्रातून दुय्यम रोजगार सहाय्यक कांचे नियुक्ती रद्द करणे.
पुढे निवेदन निवेदनात नमूद केले बुलढाणा जिल्ह्यामध्ये 837 ग्राम रोजगार सहाय्यक कार्यरत असून अतिशय कमी मानधनावर समाधान म्हणून प्रशासनाने सोपवलेली कामे योग्य प्रकारे पार पाडतात परंतु मिळालेल्या मानधनावर त्यांच्या कुटुंबांचे दोन वेळचे जेवण सुद्धा पोटभर करू शकत नाहीत असे असताना देखील प्रशासन ग्रामरोजगार सहाय्यक यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. केलेल्या कामाचे तुरळक मानधन मिळत असताना देखील प्रशासनामार्फत इतर कामेही ग्राम रोजगार सहाय्यक यांचे अधिकार क्षेत्रात नसताना सुद्धा दबाव आणून पूर्ण करण्यास मजबूर केल्या जाते.
वरील मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून योग्य तो निर्णय आपल्या स्तरावरून घेण्यात येईल अशी आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील सर्व रोजगार सहाय्यक यांना आशा आहे
प्रमुख मागण्या संदर्भात प्रशासनाने योग्य कारवाई करताना काही कसूर केल्यास 20/0 2 /2026 पासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये बेमुदत काम बंद आंदोलन,मोर्चे काढण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील.
सदर निवेदनावर श्रीमंत देशमुख पृथ्वीराज गवळी संजय मोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments