Advertisement

शिरला नेमाने येथे श्री संत सेवालाल महाराज जन्मोत्सवा निमित्त रक्तदान शिबिर संपन्न*खामगांव/(संतोष आटोळे)

*शिरला नेमाने येथे श्री संत सेवालाल महाराज जन्मोत्सवा निमित्त रक्तदान शिबिर संपन्न*
खामगांव/(संतोष आटोळे)
*जयराम गड:-* येथून जवळच असलेल्या शिरला नेमाने येथील जयराम महाराज सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

येत्या १५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांची जयंती सालाबाद प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी दर दिवशी वेगळा सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प संत जयराम महाराज सांस्कृतिक क्रीडा मंडळाने केलेला आहे. त्यामध्ये रक्तदान शिबिर , प्रबोधनपर कीर्तनकार रामपाल धारकर  महाराज यांचे कीर्तन, महाप्रसाद आणि शोभायात्रा अशा उपक्रमांचा समावेश आहे. त्यापैकी रक्तदान शिबिराच्या आयोजन बुधवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. सर्वप्रथम संत श्री सेवालाल महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सदर उद्घाटन प्रसंगी प्रणाली देशमुख वै. अधि.खामगांव,डॉ.जिवन राठोड, वै.अधि.शिरला नेमाने,राजश्री पाटील,रक्तपेढी तज्ञ.राम अंभोरे, रक्तपेढी समुपदेशक,विष्णू कदम,शिंदे सेना ता.उपप्रमुख शिरला नेमाने.अशोक तायडे सर लाखनवाडा,संदीप राठोड,सामाजिक कार्यकर्ता जयराम गड. हे उपस्थित होते.

उद्घाटन झाल्यानंतर अशोक तायडे सर यांनी संत श्री सेवालाल महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकून उपस्थिताना संबोधित केले.
यावेळी डॉ.जिवन राठोड (वैद्यकीय अधिकारी, शिरला नेमाने)
जया खंडेराव आशा सेविका,हेमराज चव्हाण,जिवन चव्हाण ,प्रशांत चव्हाण ,जयेश चव्हाण ,प्रफुल्ल चव्हाण ,लक्ष्मण राठोड ,कल्पेश राठोड ,ओम राठोड ,अभिषेक जाधव ,अभिषेक पाचपोर,वैभव धुरंधर,संदिप राठोड,दिपक बंड असे एकूण १५ रक्तदात्यांनी आपला सहभाग दर्शविला.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जयराम महाराज सांस्कृतिक क्रीडा मंडळातील सर्व युवक वर्ग, भारती काळे, मो.आतेहशाम मो. अन्सार,मेघा वालयरे, कैलास राऊत, प्रियंका परिहार, आशिष भिवसाने ,राजेश तायडे, अर्चना चव्हाण, देवकन्या खंडेराव, नूतन घोरपडे, प्रशांत पांढरे यांनी परिश्रम घेतले.तसेच स्थानिक कार्यकर्ते, गावातील प्रतिष्ठित मंडळी याप्रसंगी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments