*पंचमदास महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता*
...माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी घेतले दर्शन.
खामगाव/(संतोष आटोळे) : तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत पंचमदास महाराज मठ येथे श्री पंचमदास महाराज पुण्यतिथीनिमित् दि.06 फेब्रुवारी 2026 पासुन श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह मोठ्या भक्तिभावात व उत्साहापुर्ण वातावरणात प्रारंभ झाला. आठवडाभर चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात भागवत कथा, हरिपाठ, भजन-कीर्तन, प्रवचन, नगरप्रदक्षिणा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सप्ताहात प्रमुख भागवताचार्य ह.भ.प. श्री. प्रकाश महाराज मोरेखेडे (माटोळेवाडी आश्रम) यांचे प्रभावी कथामृत लाभले. तसेच विविध दिवसांमध्ये ह.भ.प. श्री. अनिल महाराज, ह.भ.प. श्री. गणेश महाराज, ह.भ.प. श्री. गोपाल महाराज पिंपळे तसेच इतर मान्यवर कीर्तनकार व प्रवचनकार यांनी समाजप्रबोधनपर कीर्तन व प्रवचने केली. स्थानिक भजन मंडळे, महिला भजन मंडळ व युवक मंडळ यांचा सहभाग उल्लेखनीय होता.दैनंदिनक कार्यक्रमात सकाळी काकडा आरती, त्यानंतर भागवत कथा, सायंकाळी हरिपाठ व रात्री हरिकीर्तन असा दिनक्रम पार पडला.
दि.14 फेब्रुवारी 2026 रोजी या अखंडत हरिनाम सप्ताह व नामसंकिर्तन सप्ताहाची सांगता झाली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी श्री पंचमदास महाराज मंदिरामध्ये जावुन पंचमदास महाराजांच्या मुर्तीचे पुजन करुन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष मनोज वानखडे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष बिलालखान पठाण, सुरेशभाऊ बगाडे, जगदेव सातव, वसंत सातव, बळीराम बोंबटकर, विजय चोपडे, माजी पंचायत समिती उपसभापती गोपाल सातव, डॉ. आकाश इंगळे, अनंत विठ्ठल सातव आदी उपस्थित होते.यावेळी संस्थानच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचा शेला,टोपी व पुष्पहार देवुन सत्कार करण्यात आला.तद्नंतर आरती होवुन भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या महाप्रसादाचा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह हजारो भाविकांनी लाभ घेतला. तद्नंतर सायंकाळच्या सुमारास भाविक भक्तांच्या मोठ्या उपस्थितीत मिरवणूक व नगरप्रदक्षिणा काढुन सप्ताहाची सांगता करण्यात आली.या प्रसंगी मठाचे सेवेकरी, ग्रामस्थ, भाविक व पंचक्रोशीतील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या