*राणा लकी सानंदा स्कूलमध्ये स्वामी दयानंद सरस्वती जयंती उत्साहात साजरी*
राणा लकी सानंदा एज्युकेशनल शावर मध्ये स्वामी दयानंद सरस्वती जयंती शालेय अध्यक्ष राणा अशोककुमारजी सानंदा, संतोष जी देशमुख, प्राचार्य संतोषजी शर्मा, शिक्षकवृंद व विद्यार्थी वर्ग यांचे उपस्थितीत साजरी करण्यात आली.
प्रथम मान्यवरांनी पूजन करून माल्यार्पण करण्यात आले यावेळी शिक्षिका रेखा रिंगणे व विद्यार्थ्यांनी स्वामी दयानंद सरस्वतींच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत मौलिक मार्गदर्शन केले. पुढे बोलताना ते म्हणाले की दयानंद सरस्वती हे भारतीय समाज सुधारक व आर्य समाजाचे संस्थापक होते आक्रमक व निर्भय, धर्मसुधारक, कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचा "सत्यार्थ प्रकाश "हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ प्रसिद्ध आहे
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन प्राचार्य संजय शर्मा सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंदांनी अथक परिश्रम घेतले.
संचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थिनी रिया तेलंग व प्रगती झापर्डे यांनी मानले.
0 Comments