*राणा लकी सानंदा स्कूलमध्ये दहावीचे विद्यार्थी निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न*
राणा लकी सानंदा एज्युकेशनल शावर मधील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रम साजरा करतेवेळी प्रामुख्याने उपस्थित शालेय अध्यक्ष राणा अशोकसिंहजी सानंदा,संचालक संतोषजी देशमुख, जितेंद्रजी भाटे, आनंदजी सानंदा, सौ संदेशाताई सानंदा, सनी ससाने प्राध्यापक संजय शर्मा सर शिक्षकवृंद,विद्यार्थी वर्ग यांच्या उपस्थितीत निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
प्रथम मान्यवरांनी माता सरस्वतीचे विधिवत पूजन करून माल्यार्पण केले.यानंतर वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर गीत,नृत्य सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली अनेक प्रकारचे मनोरंजनात्मक खेळ खेळण्यात आले. तदनंतर सर्व वर्ग नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय प्रशासनाकडून स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शालेय प्राध्यापक संजय शर्मा सर यांच्या मार्गदर्शनात वर्ग नववीचे विद्यार्थी व शिक्षकवृदांनी अथक परिश्रम घेतले.
संचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थिनी रिया तेलंग, प्रगती झापर्डे, शिल्पा देशमुख यांनी मानले.
स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Comments