Advertisement

गजानन महाराज नामसमरण परिवारा तर्फे महाशिवरात्रीच्या पावनपर्वावर श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण तथा महाप्रसादाचे आयोजन*

*गजानन महाराज नामसमरण परिवारा तर्फे महाशिवरात्रीच्या पावनपर्वावर  श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण तथा महाप्रसादाचे आयोजन*
             महाशिवरात्री च्या पावन पर्वावर दासगणू महाराज विरचित श्री. गजानन विजय ग्रंथाचे पारायण करण्यात आले. याचे आयोजक विजय पाटील, संदीप ठाकूर, राहुल जोशी, संतोष जोशी, प्रसादजी शिरसाट हे होते. कार्यवाहक दिलीप नारायण पाटील हे हि सहभागी झाले होते.
             महाशिवरात्री निमित्त प्रसादजी शिरसाट यांच्या भगिनी सौ. सविता खोंड, नासिक यांच्या सुमधुरवाणीतून पारायण करण्यात आले.
               सदर कार्यक्रमास भाविक भक्त बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच सोमवार दि. 16/02/2025  ला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यात संत गजानन माऊली संस्थांचाही खारी चा वाटा आहे. तरी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक समिती तर्फे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments