*संत गजानन महाराज सेवाभावी बहुउद्देशीय संस्था पारस, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला तर्फे भंडाऱ्यासाठी अन्नदान वाटप*
संत गजानन महाराज सेवाभावी संस्था पारस,तालुका बाळापूर, जिल्हा अकोला ही संस्था सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भंडाऱ्याच्या औचित्य साधत संत गजानन महाराज सेवाभावी संस्था पारस तालुका बाळापूर जिल्हा अकोला तर्फे अन्नदान करण्यात आले यात खारीचा वाटा म्हणून गहू, तांदूळ, चनाडाळ, साखर व इतर साहित्याचे वाटप संत गजानन भाऊ उद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा चंदाताई ददगाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
पर्यावरणाचे समतोल राखण्याकरिता वृक्षारोपण चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात बेल वृक्ष,पारिजात,बकुळ या महत्त्वपूर्ण झाडांचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले.
संत गजानन भाऊ उद्देश्य संस्था पारस, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असते हे विशेष.
सदर आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
0 Comments