Advertisement

युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात व जल्लोषात साजरी*खामगांव/(संतोष आटोळे)

युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात व जल्लोषात साजरी*
खामगांव/(संतोष आटोळे)
        युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष श्री. गोपाल अग्रवाल सर तसेच प्राचार्य श्री. अनिरुद्ध अवचार सर उपस्थित होते.त्यांनी शिवाजी महाराजांच्या कामगीरी विषयी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
कार्यक्रमात माहि जैन, प्रसिद्धी थापा, वेदश्री सव्वालाखे, आदर्श काचकुरे, कृष्णा पुरोहित, विराट ठोंबरे, सुपेश मस्के, शिवांश पवार व भाविका बोदडे यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आपले विचार प्रभावीपणे व्यक्त केले. तसेच प्राची, स्वरा, अथर्व, रितेश, सलोनी, आनंदी, नैतिक व रुद्र यांनी देशभक्तीपर गीतगायन सादर केले.

प्राची पवार, स्वरा पवार, अथर्व केळोदे, आराध्या सानप, आरुशी वायाळ यांनी बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत रेयांश पाटील व देवांश अनासने यांनी प्रभावी भूमिका साकारली, तर जिजाबाई यांची भूमिका अक्षदा गवळी व आराध्या सावंत यांनी उत्कृष्टरीत्या सादर केली.
शाळेच्या उपप्राचार्या सौ. अंकिता राठी मॅडम यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित मार्गदर्शनपर भाषण केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन कु. रिया जैन व स्वरा जयस्वाल यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. स्वप्ना चव्हाण मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. संगीता देशमुख मॅडम, सौ. सपना रेठेकर मॅडम, पूजा तायडे मॅडम, रेखा तायडे मॅडम, जयश्री बुंदेले मॅडम तसेच इतर शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शौर्य व संस्कारांची भावना अधिक दृढ झाली. 🚩 कार्यक्रमाची सांगता कु. सानवी टेकाडे व स्वरा पवार यांच्या शिवगर्जनेनी झाली.

Post a Comment

0 Comments