*बोरजवळा दिव्यांग बांधवांना मागील पाच वर्षापासून दिव्यांग निधी न मिळाल्यामुळे दिले गट विकास अधिकारी यांना निवेदन*
बोरजवळा येथील दिव्यांग बांधवांना मागील पाच वर्षापासून दिव्यांग निधी न मिळाल्यामुळे दिव्यांग बांधवांनी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले असून निवेदनात नमूद केले आहे की आम्ही बोरजवळा येथील दिव्यांग ग्रामस्थ असून मागील पाच वर्षापासून कुठल्याच प्रकारचा दिव्यांग निधी मिळाला नाही अथवा कुठल्याच प्रकारचे ग्रामपंचायतने दिव्यांग कल्याणाची कामे केले नाही. तरी शासनाच्या आदेशानुसार एकूण येणाऱ्या निधीचा पाच टक्के राखीव निधी हा दिव्यांग कल्याण साठी वापरणे हे ग्रामपंचायतीला बंधनकारक असले तरी या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून दिव्यांग बांधवांना निधी मिळण्यापासून वंचित ठेवले गेले आहे.
तरी दिव्यांग बंधू बोरजवळा यांनी या निवेदनात मागणी केली आहे की, आमच्या हक्काचा निधी आम्हाला देण्यात यावा तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आम्ही पूर्ण ग्रामस्थ लोकशाही पद्धतीने आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला आहे.
चंद्रभान दाभाडे, उल्हास चोपडे व ग्रामस्थांनी प्रहार नेते बच्चुभाऊ कडू यांची भेट घेऊन आपल्या व्यथा सांगितल्या. सदर प्रकरणाची चौकशी करून लवकरात लवकर निधीचा वाटप केल्या जाईल असे आश्वासन दिले.
एकीकडे शासनाचे धोरण आहे की दिव्यांगाना चांगली वागणूक द्या, दिव्यांगांना निधी वाटप करा, दिव्यांगांची प्रगती रोखू नका आणि एकीकडे दिव्यांग बांधवांना वेठीस धरल्या जाते हे कितपत योग्य आहे याचा विचार प्रशासन करणे गरजेचे आहे.
सदर निवेदनावर चंद्रभान दाभाडे, उल्हास चोपडे यांच्यासह इतर दिव्यांग बांधवांच्या सह्या आहेत.
0 Comments