Advertisement

जाहिरात व वृत्तपत्रांना 150% दरवाढ व इतर विविध मागण्यांसाठी व्हाईस ऑफ मीडिया तर्फे निवेदन सादर*खामगांव /(संतोष आटोळे )

*जाहिरात व वृत्तपत्रांना 150% दरवाढ व इतर विविध मागण्यांसाठी व्हाईस ऑफ मीडिया तर्फे निवेदन सादर*
खामगांव /(संतोष आटोळे )
            राज्यातील वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून कार्यरत असून जनतेपर्यंत शासनाच्या योजना निर्णय आणि धोरणे पोहोचविण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करीत आहे. तथापि गेल्या काही वर्षात वृत्तपत्र उद्योगावर आर्थिक दृष्ट्या मोठ्या ताण निर्माण झाला आहे. आम्ही अनेक वेळा व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने या संदर्भात निवेदन दिले, आंदोलन केले तरी त्याचा काडीमात्र फायदा झाला नाही. आता तरी शासन याकडे लक्ष देईल ही अपेक्षा आहे.


              सन 2019 पासून आजतागायात कागद, प्रिंटिंग मटेरियल, केमिकल्स, मनुष्यबळ यासारख्या मूलभूत खर्चामध्ये सुमारे 150 टक्के वाढ झालेली आहे. या उलट शासनाकडून मिळणाऱ्या जाहिरात दरांमध्ये कोणतीही समर्पक वाढ झालेली नाही. त्यामुळे अनेक लघु व मध्यम वृत्तपत्राचे अस्तित्व धोक्यात आले आहे.  याच विषयाला अनुसरून गेल्या तीन दिवसापासून सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी लक्षणीय मागणी करत आंदोलन सुरू आहे. पत्रकारांनी सादर केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये जाहिरात दरवाढ, ई टेंडर जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करणे किमान जाहिरात आकार २०० चौ. से. निश्चित करणे तसेच शासकीय जाहिरातीचे देयक 30 दिवसात अदा करण्याची तरतूद करण्यात यावी.मोठ्या वृत्तपत्राप्रमाणेच लघु व माध्यम वृत्तपत्रांनाही जाहिरातीचे वितरण न्याय्य पद्धतीने यावे. जाहिरात वाटप करताना भेदभाव करू नये.
             शासनाच्या विविध बैठक निर्णय व धोरणे यांची माहिती वेळेत आणि अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात यावी जेणेकरून पत्रकारिता मध्ये पारदर्शकता राखली जाईल. अनेक जिल्ह्यात बरीच शासकीय कार्यालय जाहिराती माहिती खात्यामार्फत देण्यात यावी आणि त्यावर माहिती खात्याचे नियंत्रण असावे.
             ज्या वृत्तपत्रांनी जाहिरात यादीमध्ये येण्यासाठी तपासणीची मागणी केली आहे अशा वृत्तपत्राचे तपासणी थांबली आहे त्याला तातडीने सुरुवात करावी. ज्या वृत्तपत्रांनी २५ वर्षे पूर्ण केले आहे त्यांचे नैसर्गिक दरवाढ लागू करावी याचे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहे त्यांना तातडीने नैसर्गिक दरवाढ लागू करावी वृत्तपत्र उद्योग हा केवळ व्यवसाय नसून तो लोकशाहीचा पाया आहे.
 जर आर्थिक अडचणीमुळे  हा उद्योग कमकुवत झाला तर त्याचा थेट परिणाम जनतेच्या माहितीचे अधिकारावर होईल, त्यामुळे वरील सर्व मागण्या तातडीने मान्य करून योग्य तो शासन निर्णय घ्यावा असे निवेदनात नमूद केले आहे.
               निवेदनावर खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोरआप्पा भोसले, मंगेश तोमर,नाना हिवराळे, शरदबाप्पू देशमुख, अशोक जसवाणी, धनंजय वाजपे,सिद्धांत उंबरकर,  दगडू तायडे,पंकज गमे,अनिल खोडके,नितेश मानकर,संतोष धुरंधर,मुकेश हेलोडे,संतोष आटोळे,सुधीर टिकार, सुधाकर ठाकरे,पद्माकर धुरंदर,सिद्धेश्वर निर्मळ,मनोज नगरनाईक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments