राधेश्याम बंगाळे यांचे पिंपळगाव सोनारा येथे व्यसनमुक्ती व विविध आजारावर आयुर्वेदिक उपचार शिबिर संपन्न
लोकसेवा आयुर्वेदिक नशामुक्ती, मुळव्याध उपचार केन्द्र साखरखेर्डा च्या वतीने "गाव तिथे आम्ही, व्यसनमुक्तीसाठी तुम्ही" गाव तिथला प्रत्येक माणूस, या अभियाना अंतर्गत पिंपळगाव सोनारा येथे दिनांक 30 मार्च रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
लोकसेवा नशा मुक्ती केंद्र अंतर्गत संचालक राधेश्याम बंगाळे यांनी अनेक रुग्णांना मार्गदर्शन व औषधी देऊन नशा मुक्त व इतर आजार बरे केले आहेत. अगदी वाजवी दरामध्ये विविध आजारावर मार्गदर्शन करून आयुर्वेदिक औषध देऊन शंभर टक्के उपचार या केंद्रामार्फत आतापर्यंत करण्यात आले आहे अनेक हजारो रुग्णांनी विविध आजारावर या केंद्रामार्फत उपचार व औषधी घेऊन बरे झालेले आहेत त्याच अनुषंगाने पिंपळगाव सोनारा येथे घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये विविध आजार असलेल्या रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. यामध्ये गावातील व्यसनाधीन झालेले तरुण , तसेच मुळव्याधग्रस्त , वात, पित्त, हाडाचे विकार, वजन वाढणे कमी करणे वजन वाढणे कमी करणे अशा विविध आजारावर उपचार
करण्यासाठी आलेल्या उपचार करण्यासाठी आलेल्या रुग्णांना रुग्णांना मार्गदर्शन करून मार्गदर्शन करून आयुर्वेदिक औषधी चे वाटप करण्यात आले. या शिबिराचे आयोजन सरपंच नितीन ठोसरे तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर साखरे बंडू ठाकूर दलित खिल्लारे केशव ठोसरे गणेश पंजरकर जगन्नाथ पंजरकर शत्रुघन साखरे वामन साखरे विजू मुठठे गुलाब मुठे समाधान गवई कैलास गवई पवन गवई समाधान खिल्लारे व असंख्य व्याधीने ग्रस्त असलेले व्यक्ती या शिबिरा मध्ये सामील झाले होते हे शिबिर श्री फुलगीर बाबा मठ पिंपळगाव सोनारा येथे संपन्न झाले.
0 Comments