Advertisement

एकनिष्ठा द्वारे श्री रामनवमी उत्सव पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरी*खामगांव/(संतोष आटोळे)

*एकनिष्ठा द्वारे श्री रामनवमी उत्सव पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरी*
खामगांव/(संतोष आटोळे) स्थानिक एकनिष्ठा रक्तसेवा गौसेवा फाऊंडेशन द्वारे श्री रामनवमी उत्सव पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने दिनांक 26/03/2026 रोजी साजरी करण्यात आली. सर्वप्रथम एकनिष्ठा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरज यादव, त्यांच्या कुटुंबानी व श्रीरामनवमी उत्सव समिती तर्फे सतिफैल येथील सीतला माता मंदिरात सितला माताची पुजा - आरती करून शोभायात्रा मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. नंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले. सदर शोभायात्रेत आराध्य दैवत प्रभु श्री रामाची मूर्ती आणि शिष चे दानी - बाबा खाटूश्यामजी ची झाकी छत्रपती शिवाजी महाराज झाकी व तोफ गोरिला लोकांचे आकर्षणाचे केंद्र होते आणि महिला लहान मुला मुलीच्या टाळकरी - वारकरी यांच्या पाऊलीने भक्तिमय उत्साहित वातावरण निर्माण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. या सह कदमापुर वाद्य मंडळी,  ढोल - ताशे व इतर वाद्यांमुळे सांस्कृतिक आणि पारंपरिक वातावरणात श्री रामनवमी उत्सव साजरी करण्यात आली. सदर मिरवणुकीत आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी सदिच्छा भेट देऊन एकनिष्ठा संघटनेचे कार्यांचे व समितीचे कौतुक केले. शोभायात्रा सहभागी मार्गदर्शक शिवमुरत यादव, नरेश सुरेका, ज्ञानेश सेवक सर, रघुनाथ काळे, किशोर बुंदेले, संजय थोरात, मनोज अहिर, सुनिल राऊत, 



हितेश पदमगिरवार, रवी माळवंदे, राजेश यादव, युवराज भेरडे तसेच एकनिष्ठा रामनवमी जन्मोत्सव समिती प्रमुख धिरज यादव यांच्या मार्गदर्शनात समितीचे अध्यक्ष प्रदीप शमी, मोहीत वरणगांवकर, सचिव डॉक्टर ऋषीकेश उन्हाळे पाटील, अमोल तायडे, शुभम कुंदनवार, योगेश राऊत, चेतन कदम, नरेश मसनेवार, मनोज अहिर, अकील खान, शुभम यादव, अजय ताठे, गोलु इंगळे, खुशाल सेवक, निखिल यादव, मंगेश चराटे, महादेव पन्हाळकर, कुंदन यादव, अजय थोरात, आदित्य अहिर, अंकीत यादव, शिव यादव, विरेंद्र पिल्ले, पियुष यादव, शुभम शमी, सिद्धेश्वर निर्मळ, अनुज यादव,कार्तिक यादव, अर्पण यादव, वैभव कापडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. श्री राम मंदिर, सिव्हील लाईन येथे सदर शोभायात्रेचे समारोप करण्यात आले. समारोप करतांना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरज यादव यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस प्रशासन आणि शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी तन - मन - धनाने सहकार्य करणारे नागरिकांचे आभार मानले...अशी माहिती सिद्धेश्वर निर्मळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Post a Comment

0 Comments