Advertisement

परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांचा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केला सत्कार*खामगाव/(संतोष आटोळे )

*परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांचा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केला सत्कार*
खामगाव/(संतोष आटोळे )          महाराष्ट्र सरकारने ब्राम्हण समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन केलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांना देण्यात आली आहे.  महाराष्ट्र ब्राम्हण सभा खामगावद्वारा रविवार दि.08 मार्च 2026 रोजी उपनयन संस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळयाला परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅबीनेट मंत्री दर्जा प्राप्त असलेले कॅप्टन आशिष दामले यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले हे उपनयन संस्कार सोहळयासाठी खामगाव येथे आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी खामगाव विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने  कॅप्टन आशिष दामले यांचा शाल व पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खामगाव शहरअध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खामगाव तालुका अध्यक्ष मनोज वानखडे,प्रफुल्ल कुळकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments