जामोद येथे आगळ्या वेगळ्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा
जामोद येथे बारी समाज मंगल कार्यालय येथे रविवार दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन निम्मित पहाटे ५.३० वाजता महिला आरोग्य मार्गदर्शन, योगा व झुंबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या आयोजनापूर्वी मागील १५ दिवसांपासून मोफत झुंबा व योगा क्लास चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सौ गंगूबाई दामधर तर आरोग्य विषयक मार्गदर्शन करिता मेडिकल ऑफिसर डॉ. नेहा पुंडकर व झुंबा ट्रेनर म्हणून सौ. अश्विनी ढगे उपस्थित होते.
यावेळी महिलांनी नियमित योगा व झुंबा करण्याचा निर्धार केला.
यावेळी बोलतांना डॉ नेहा पुंडकर यांनी महिलांनी PCOD समस्या व आरोग्य कडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य हीच स्त्री सशक्तीकरणाची गुरुकिल्ली असल्याचे मत आयोजक सौ. मिनल दामधर यांनी व्यक्त केले व योगा व झुंबा चे मोफत क्लास नेहमी करिता नियमित सुरू राहणार आहेत असे सांगितले.
तर योगा व झुंबा हेच खऱ्या निरोगी आयुष्याची सीडी असली झुंबा ट्रेनर सौ अश्विनी ढगे यांनी सांगितले.
पहाटे ५.३० वाजता चे आयोजन व महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments