Advertisement

पाणी ठेवा,पक्षी वाचवा' राहत्या घरी प्रत्येक व्यक्तीला पाणी ठेवण्याचे आवाहन* *'त्या' जीवांची तहान फक्त दोन थेंब पाण्याची* *खामगाव (संतोषआटोळे )*

*'पाणी ठेवा,पक्षी वाचवा' राहत्या घरी प्रत्येक व्यक्तीला पाणी ठेवण्याचे आवाहन*
      *'त्या' जीवांची तहान फक्त दोन थेंब पाण्याची*
 *खामगाव (संतोषआटोळे )*        शहरात उन्हाळ्याच्या झळा जाणू लागल्या आहे. पक्षांना सध्या कउन्हाचा फटका बसणे सुरू झाले आहे उन्हाची तीव्रता दिवसा गणिक वाढत असून प्रत्येकाने पक्षासाठी पाण्याची व्यवस्था करावी असे आव्हान पक्षी मित्रांच्या वतीने करण्यात आले आहे.उन्हाळ्यात अन्न पाण्यासाठी पक्षांचे होणारी भटकंती थांबविण्यासाठी शहरातील व परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. गत दहा वर्षात परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली त्यामुळे पक्षांची संख्या कमी झाली असल्याचे पक्षी मित्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र जेवढे पक्षी आपल्या परिसरात असतील त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि उन्हाळा सुसह्य करण्यासाठी नागरिकांनी पक्षांसाठी पाण्याची भांडी ठेवावीत असे आवाहन पक्षी मित्रांच्या वतीने करण्यात येत आहे.
     सद्यस्थितीत पक्षी कमी होऊ लागले असून प्रत्येकाने जबाबदारी ओळखून राहत्या घरी जमेल त्या ठिकाणी पक्षाच्या दाण्या पाण्याची सोय करणे गरजेचे असल्याचा सूर पक्षी मित्रांमध्ये उमटत आहे. पक्षी निसर्गचक्रातील एक महत्त्वाचा घटक असून त्याची मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. नाल्याचे पात्र कोरडे पडू लागल्याने पक्षांना शाश्वत असे जलसाठे तूरळक आहेत.त्यामुळे पक्षांची पाण्यासाठीची भटकंती टाळण्यासाठी खामगाव वासियांनी त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व दोन दाणे अन्नाची व्यवस्था करावी.

     नागरिकांनी मानवतावादी दृष्टीकोन बाळगावा 
             सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे उष्णतेचे प्रमाण चांगलेच वाढल्याने याचाच त्रास पक्षांना होत आहे दरम्यान त्यांना पाण्यात भिजावे लागते व महत्त्वाचे म्हणजे पक्ष्यांना  पिण्याच्या पाण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी मानवतावादी दृष्टिकोनातून अंगणात घराच्या टेरेसवर कंपाउंड वॉल वर पाण्याचे भांडे ठेवावे असे आवाहन येथील पक्षीमित्र संजय गुरव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments