Advertisement

जिजाऊ स्कुल ऑफ स्कॉलर्समध्ये महिला दिन उत्साहात साजरा* *महिलांनी आत्मनिर्भर बनत कायद्याची माहिती करून घ्यावी - अँड. आशा भागवत* खामगाव/(संतोष आटोळे )

*जिजाऊ स्कुल ऑफ स्कॉलर्समध्ये  महिला  दिन उत्साहात साजरा* 
         *महिलांनी आत्मनिर्भर बनत कायद्याची माहिती करून घ्यावी - अँड. आशा भागवत* 
खामगाव/(संतोष आटोळे )            आजच्या काळात स्त्री ही सर्व क्षेत्रात अग्रेसर  असून चुल आणि मुल या संकल्पने सोबतच, करिअर, आत्मनिर्भरता याला  प्राधान्य देत आहे. मातृत्वा-सोबतच कर्तृत्वाची जाणीव ठेवूनच संयम व सर्मपणाच्या भुमीकेत सतत वावरत असते. मात्र, आजही शिक्षित असूनही महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. याचे कारण म्हणजे महिलांना त्यांच्यासाठी असणे कायदे याची माहिती नाही. त्यामुळे महिलांनी आत्मनिर्भर बनत कायद्याची माहिती करून घ्यावी ती काळाची गरज आहे असे आवाहन अँड. आशा भागवत यांनी केले.
     तालुक्यातील आवार येथील जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर मध्ये ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अँड. भागवत बोलत होत्या. यावेळी त्यांनी महिलांसाठी कोणते कायदे आहेत याबाबत सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संस्थेच्या सचिव प्रा. सुरेखा गुंजकर होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात  महिला म्हणुन त्यांची जबाबदारी पार पाडत असतात आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन  शारीरिक स्वास्थ्य जपावे असे आवाहन केले. कार्यक्रमाला गुंजकर कॉलेजचे प्राचार्य सतीश रायबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

    कार्यक्रमाची सुरुवात ज्यांनी महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून झाली. यावेळी विविध क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून देशाचे नाव मोठे केले, अश्या कर्तुत्ववान महिलांच्या कार्यावर केजी - २ च्या  विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर करून  उपस्थितांची दादा मिळविली.  तर काही विद्यार्थीनींनी माता  जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेषात येऊन मनोगत व्यक्त केले. तसेच स्व. लता मंगेशकर यांचे गीत सादर केले. केजी - १ च्या विद्यार्थिनींनी देखील उत्कृष्ट नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र मांडवेकर यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर सर यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे संचालन  कुणाल हिवराळे तर आभार प्रदर्शन विशाल घोडके यांनी केले. कार्यक्रमाकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments