Advertisement

पंचशील होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय खामगांव, जागतिक महिला दिनानिमित्त भव्य Walkathon व नारीशक्ती गौरव पुरस्कार सोहळा थाटात संपन्न*खामगांव /(संतोष आटोळे)

*पंचशील होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय खामगांव, जागतिक महिला दिनानिमित्त भव्य Walkathon व नारीशक्ती गौरव पुरस्कार सोहळा थाटात संपन्न*
खामगांव /(संतोष आटोळे) पंचशील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय खामगांव, द्वारा दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने
“Give to Gain” (देण्यासाठी पुढे या मिळवण्यासाठी साठी सक्षम व्हा)" ही संकल्पना घेवुन
खास महिलांसाठी Walkathon स्पर्धेचे दि. ०८ मार्च २०२६ रोजी आयोजन करण्यात आले होते. सकाळी ५ वाजून ३० वाजता निष्ठा पुरवार
यांचे झुंबा डान्स ने सुरवात होवून ६.१५ वाजता महाविद्यालयातुन Walkathon ला डॉ. दादासाहेब कविश्वर यांनी हिरवा झेंडा दाखवुन सुरुवात केली
यावेळी डॉ. राजेश राजोरे व रमाकांत गलांडे सर प्रमुख उपस्थित होते. वॉकेथॉन जलंब नाका, नांदुरा रोड, गोकुळ नगर, मार्गे थेटे हॉस्पीटल, जलंब रोड,
नाना-नानी पार्क, जलंब नाका व शेवटी पंचशील होमिओपॅथीक मेडीकल कॉलेज येथे समाप्त झाले.
सहभागी स्पर्धेकांचे ३ वयोगट करण्यात आले होते. यामध्ये गट अ १२ ते ३० वर्ष वयोगट, गट ब - ३१ ते ५० वर्ष वयोगट व गट क - ५०
वर्ष व त्यावरील वयोगट अशी विभागणी करण्यात आली होती. बक्षिस वितरणापुर्वी महाविद्यालयातील विद्यार्थीनीनी फॅशमॉप सादर करण्यात आला.
महाविद्यालयीन परीसरामध्ये महिलांविषयी तयार केलेल्या विविध पोष्टरचे प्रदर्शन देखील लावण्यात आले होते.

वरील वयोगटात अनुक्रमे गट अ मध्ये रश्मी चिंबारिया प्रथम बक्षिस रु. ३१००, अनिता मुलझडा द्वितीय बक्षिस २१०० आणि दुर्गा काकड
तृतीय बक्षिस रु. ११०० पुरस्कार गट ब मध्ये मध्ये - भाग्यश्री नरेंद्र पोहरे प्रथम बक्षिस रू. ३१००, शुभांगी संदीप काटोले द्वितीय बक्षिस २१०० आणि
रश्मी विप्लव कवीश्वर. तृतीय बक्षिस रु. ११०० आणि गट क मध्ये मध्ये माधुरी भांबेरे प्रथम बक्षिस रू. ३१००, जयश्री देशमुख द्वितीय रुपये 2100 आणि सुजाता खुराटके तृतीय बक्षीस रुपये अकराशे देण्यात आले. यामध्ये ठाकरे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सौजन्याने तर करिता मेंढे स्पेशालिटी हॉस्पिटल सौजन्याने देण्यात आले.
              नारी शक्तीचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. याप्रसंगी विशेष सन्मान नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर व स्नेहा आकाश फुंडकर आणि नवनिर्वाचित नगरसेविकांचा व नगरसेवक पत्नींचा,नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला.
             याप्रसंगी डॉक्टर अजिंक्य कवीश्वर यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती सांगितली.सदर शिबिराचा 200 हून अधिक महिला रुग्णांनी लाभ घेतला. त्यांना पुढील तीन महिने मोफत होमिओपॅथिक औषध देण्यात येणार आहे.
              तसेच खामगाव शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये मुलींकरिता आरोग्यबाबत जनजागृतीच्या उद्देशाने मानसिक शारीरिक आरोग्याबाबत जसे (PCOD) बाबत माहितीपर व्याख्यान महाविद्यालयातील प्राध्यापकांमार्फत आयोजित करण्यात आले होते.तसेच वाकथॉन कार्यक्रमाच्या आयोजन बाबत माहिती दिली.
                 कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचशील होमिओपॅथिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर दादासाहेब कवीश्वर हे होते. त्यांनी महिला दिनाच्या वैशिष्ट्ये बद्दल तसेच महिलांच्या अद्वितीय व अतुल्य कार्याबद्दल माहिती देत नारिशक्तीचा गौरव करण्याचे महत्त्व अधोरेखित करून आयोजकांचे कौतुक केले. प्रमुख अतिथी नवनिर्वाचित नगराध्यक्ष अपर्णाताई सागर फुंडकर याप्रसंगी बोलताना म्हणाले की प्रत्येक दिन महिला दिन असून महिलांनी प्रत्यक्ष क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतले आहे सन्मानाबरोबरच कामाचे जबाबदारी देखील वाढली आहे, याची मला जाणीव आहे. आपणा सर्वांच्या सहकार्याने खामगावला एक आदर्श शहर बनवण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.
              याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून सौ स्नेहा ताई आकाश फुंडकर  ह्या होत्या त्यांनी महिलांनी आपापल्या क्षेत्रात करीत असलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व याही पुढे महिला  उत्तुंग  भरारी घेतील असे म्हणत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सौ मंगलाताई कवीश्वर सचिव पंचशील होमिओपॅथिक शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव, सौ. स्नेहाताई आकाश फुंडकर, सौ सीमाताई भडंग,सौ श्रद्धा ताई देशपांडे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजिंक्य कवीश्वर, सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष डॉ. विप्लव कवीश्वर, प्रोजेक्ट प्रमुख डॉक्टर शिल्पा कवीश्वर हे मान्यवर उपस्थित होते.
             सदर कार्यक्रमाप्रसंगी आदिवासी आश्रम शाळेच्या स्वयंसिद्ध या उपक्रमाच्या विद्यार्थिनींनी शिवलेल्या पिशव्यांचा स्टॉल देखील लावण्यात आला होता. वाकथॉनच्या आयोजनामध्ये शहरातील तसेच पंचक्रोशीतील शेकडो विद्यार्थ्यांनी व महिलांनी तसेच विविध संस्था व महिला मंडळांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला. 
लायन्स क्लब संस्कृती, खामगाव यांचा विशेष सहभाग लाभला. कार्यक्रम सूत्रसंचालन डॉ. स्मिता लष्करे व डॉक्टर करिष्मा बोरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर सौ.शिल्पा कवीश्वर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments