*पवित्र रमजान महिना समाजात एकोपा आणि बंधुभाव वाढविण्यास प्रेरणा देतो ...माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा*
*राणा फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आायेजित रोजा इफ्तार कार्यक्रमात शेकडो मुस्लीम बांधवांनी घेतला सहभाग*
खामगाव /(संतोष आटोळे ) पवित्र रमजान महिना हा संयम,त्याग आणि आत्मशुध्दीचा संदेश देणारा महिना आहे. या महिन्यात मुस्लीम समाज बांधव रोजे ठेवुन अल्लाहाची इबादत करतात.तसेच गरजूंची मदत,दान,धर्म आणि बंधुभाव वाढविण्यावर विशेष भर देतात. रमजान केवळ उपवासाचा महिना नसुन तो मानवतेचा,एकात्मतेचा आणि शांततेचा सुंदर संदेश देणारा रमजान महिना समाजात एकोपा आणि बंधुभाव वाढविण्यास प्रेरणा देतो असे प्रतिपादन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.बुधवार दि.18 मार्च 2026 रोजी मस्तान चौक मस्जिद समोरील प्रांगणात राणा फाउंडेशनच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी रमजान महिन्यानिमित्त रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहरअध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,तालुकाध्यक्ष मनोज वानखडे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे खामगाव तालुका अध्यक्ष बिलाल खा पठान,संजुभाऊ शर्मा,नगरसेवक तहेसीन शाह, अजीम कुरेशी,केशव कापले, शमीसेठ कुरेशी,सलीमभाई पत्रकार,सैयद इमरान,मुकदद्र खान आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की,रमजान महिन्याप्रसंगी धार्मिक एकोपा आणि सामाजिक ऐक्य वाढविण्याच्या दृष्टीने मागील 31 वर्षापासुन राणा फाऊंडेशनच्या वतीने रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे असे सांगुन त्यांनी उपस्थितांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आणि देशात शांतता,समृध्दी आणि भाईचारा कायम रहावा अशी प्रार्थना केली.
यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते उपस्थितांना रोजा इफ्तार निमित्त पेंड खजुर,फळफ्रुट व फराळाचे वितरण करण्यात आले. यावेळी हिंदु-मुस्लीम बांध्ावांनी एकमेकांना अलींगन देवुन रमजानच्या शुुभेच्छा दिल्या व एकता प्रस्थापित करण्याचा संकल्प घ्ोतला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे तालुकाअध्यक्ष बिलाल खा पठान यांनी केले.
या कार्यक्रमाला अन्सार भाई,काकु पठान,हाफीज साहेब,अजीजभाई चायवाले,वाजीद कुरेशी,अंजुम पठान,इसाक आझाद,श्याम मोरे,तुषार चंदेल,अविनाश ढगे,वैभव वानखडे,हाजी सलीम मकवाना यांच्यासह हिंदु-मुस्लीम समाज बांध्ाव, शांतता समितीचे सदस्य,पत्रकार बांध्ाव,आजी-माजी नगरसेवक मोठया संख्येने उपस्थित होते.रमजान निमित्त मस्तान चौक परिसरात सुकामेवा,मिठाई,फळे,खजुर,रेडिमेड कपडे,बदाम,पिस्ता,काजु, शिर खुर्म्यासाठी असलेले शेवया आदी वस्तुंची दुकाने थाटण्यात आली असुन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी विविध दुकांनाना भेटी दिल्या. ईद सणानिमित्त विविध्ा साहित्य खरेदी करण्यासाठी मुस्लीम बांधवांमध्ये प्रचंड उत्साह दिसुन येत होता.
0 Comments