Advertisement

युगधर्म पब्लिक स्कूल येथे तीन ते दहावर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्प चे आयोजन*खामगांव /(संतोष आटोळे)

* *युगधर्म पब्लिक स्कूल येथे तीन ते दहा
वर्ष वयोगटातील 
विद्यार्थ्यांसाठी समर 
कॅम्प चे आयोजन*
खामगांव /(संतोष आटोळे)
     खामगाव शहरातील युग धर्म पब्लिक स्कूलमध्ये समर कॅम्पचे आयोजन दि. १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत  करण्यात आले आहे. सकाळी ९ ते १२ या वेळेत होणाऱ्या या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
या समर कॅम्पमध्ये चित्रकला, झुंबा, स्पोकन इंग्लिश, योगा, डान्स व फनी डान्स, हँडरायटिंग सराव, फन गेम्स, गुड मॅनर्स ऍक्टिव्हिटी, क्लीननेस ऍक्टिव्हिटी, हेल्दी हॅबिट्स, व्हॅल्यू एज्युकेशन तसेच कम्प्युटरशी संबंधित उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी वॉटर पुल ,ऍक्टिव्हिटीसारखे मनोरंजक उपक्रमही ठेवण्यात आले आहेत.
हा कॅम्प वय वर्ष तीन ते दहा वर्षापर्यंत विद्यार्थ्यांसाठी
 खुला आहे. खामगावातील मुले यामध्ये भाग घेऊ शकतात तीन ते दहा 
वर्ष वयोगटातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. संपूर्ण कॅम्पसाठी पाचशे रुपये फी ठेवण्यात आली  असून 


विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांनी या समर कॅम्पमध्ये सहभागी होऊन विविध कौशल्ये विकसित करण्याची संधी घ्यावी, असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क जिया मॅडम मो.नं. ७९७२६७३८८४ सुषमा  मॅडम मो.नं ९०२२३९०५६३
कल्पना मॅडम मो. नं.७०२०५९८१७७
जानवी मॅडम मो.नं.९३२८५५५६४९
अस्मिता मॅडम मो. नं.९८३४०४९१९६ 
स्कूल मोबाईल नंबर ८४८३९२७७०२
यांच्याशी संपर्क साधावा व अवश्य 
प्रवेश घ्यावा.

Post a Comment

0 Comments