ओम भाऊ देशमुख यांच्या पुढाकारातून जनरल हॉस्पिटल रक्तपेढीत रक्तदान; सेवाभावी कार्याचे कौतुक
शेगांव : शेगांवातील रक्तदान श्रेष्ठदान ग्रुप च्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सातत्याने सुरू आहे. रक्ताची गरज भासणाऱ्या रुग्णांसाठी इच्छुक रक्तदात्यांकडून रक्तदान करून घेत गरजूंना मदत करण्याचे काम हा समूह करत आहे.
दि. 14 मार्च 2026 रोजी शेगांव येथील सईबाई मोटे जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तपेढीत गरजू रुग्ण पर्वत भाऊ शिंदे यांच्यासाठी रक्तदान करण्यात आले. या वेळी समूहाशी जोडलेल्या आणि नेहमीच रक्तदानासाठी तत्पर असलेल्या एका सेवाभावी आंटी यांनी ओम भाऊ देशमुख यांच्या माध्यमातून रक्तदान करून मोलाची मदत केली. रक्तदानानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.
रक्तदान श्रेष्ठदान ग्रुप च्या या कार्यामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळत असून, समाजात मानवतेचा सुंदर संदेशही दिला जात आहे. रक्तदान हीच खरी जीवनदानाची सेवा असून, अशा सेवाभावी रक्तदात्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष आशिष सावळे यांनी या ग्रुप च्या माध्यमातून होत असलेल्या कार्य मुळे युवकांन मध्ये रुग्णसेवेची आवडत सुद्धा निर्माण केली आहे या रक्तदान श्रेष्ठदान ग्रुप च्या माध्यमातून आज असंख्य युवा सामाजिक कार्य करत आहे.
आज सईबाई मोटे सामान्य रुग्णालय येथे एका गरजू रुग्णांला रक्तदान श्रेष्ठदान ग्रुप च्या माध्यमातून सिटीस्कॅन इन्चार्ज योगेश चंदूरकर यांनी सोनू ताई साटोटे यांना रक्तदान केले.रक्तदान करतांना सुनील गवई .रवी फुंडकर. गोपाल भामदेरे, धनंजय फरताडे,सोनू ताई सटोटे, आशिष सावळे, सचिन ढमाळ, पवन भारसाकळे,दत्त आवळकर उपस्थित होते.
0 Comments