Advertisement

मल्हारपेठ ठोमसे येथे 'आम्ही ठोमसेकर 'कलाप्रेमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावातील विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या ग्रामस्थ युवकांचा विविध पुरस्काराने सन्मान.

मल्हारपेठ 
ठोमसे येथे 'आम्ही ठोमसेकर 'कलाप्रेमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावातील विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या ग्रामस्थ युवकांचा विविध पुरस्काराने सन्मान.
    ग्रामदैवत श्री शंभूराज देवाच्या यात्रेनिमित्त आम्ही ठोमसेकर.कलाप्रेमी प्रतिष्ठाणच्या माध्यमातून यात्रा उत्सवकाळात विविध धार्मिक कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम राबविले जातात यात्रा उत्सवात सामाजिक उपक्रमही राबविण्याची प्रथा आम्ही ठोमसेकर कलाप्रेमी सामाजिक प्रतिष्ठाण जोपासली आहे .दरवर्षी अशा उपक्रमातुन अशा पुरस्कारातुन नागरिक युवक युवती महिला यांचा सन्मान केला जातॊ एक सामाजिक वारसा आणी वसा जोपासणारे हे सामाजिक प्रतिष्ठाण असुन समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम.करत असतात  
    सालाबाद प्रमाणे यावर्षीही पण विविध पुरस्काचे वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम असा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. 


यात समाजरत्न पुरस्कारासाठी हर्षद देसाई,भिमराव माने ,शिवाजी माने सर, राजु कुलकर्णी ,सॊ.सुलक्षणा शिलवंत धर , सॊ.गितानंद साठे, यांची तर वैष्णव लोहार, सिद्धार्थ माने संचिता शिलवंत यांची युवा कलारत्न पुरस्काराने आणी अश्वजित शिलवंत, राजरत्न शिलवंत,विनायक कदम याची सैन्यदल सेवा पुरस्कार व गावातील अनेक   युवकांची युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित करणेत आले .यावेळी ठोमसे गावातील सेवानिवृत्त व विविध क्षेत्रात  पदोन्नती मिळालेल्या नागरिकांनाही  सन्मानपत्र देवुनही  गॊरविण्यात आले .
फोटोओळी
ठोमसे :- समाजरत्न पुरसकाराने सन्मानित करताना प्रतिष्ठाणचे मान्यवर समवेत ग्रामस्थ.

Post a Comment

0 Comments