Advertisement

महादेव संस्थानचा शिव-पार्वती विवाह सोहळा सामाजिक एकोपा आणि श्रध्देचा प्रतीक* ....माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा. सुटाळा बु. येथील महादेव संस्थानमध्ये हजारों भाविकांच्या उपस्थितीत शिव-पार्वती विवाह सोहळा उत्साहात खामगांव /(संतोष आटोळे )

*महादेव संस्थानचा शिव-पार्वती विवाह सोहळा सामाजिक एकोपा आणि श्रध्देचा प्रतीक* ....माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा. सुटाळा बु. येथील महादेव संस्थानमध्ये हजारों भाविकांच्या उपस्थितीत  शिव-पार्वती विवाह सोहळा उत्साहात 
खामगांव /(संतोष आटोळे ) शहरापासून जवळच असलेल्या सुटाळा बु.येथे प्राचीन शिव मंदिर असुन येथील महादेव संस्थानच्या वतीने या मंदिरात दरवर्ष्ाी चैत्र महिन्यात अष्टमीच्या दिवशी शिव-पार्वती विवाह सोहळा आयोजित करण्यात येत असतो. प्राचीन काळापासून सुरु असलेली ही परंपरा आजही अखंडपणे सुरु आहे. यावर्षी चैत्र नवरात्री अष्टमीच्या दिवशी बुधवार  दि.25 मार्च 2026 रोजी सुटाळा बु.येथील महादेव संस्थानमध्ये हजारो भक्तांच्या उपस्थितीत शिव - पार्वती विवाह सोहळा मोठया उत्साहात पार पडला.
शिव-पार्वती विवाहनिमित्त संस्थानतर्फे मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मानाच्या कावड यात्रे द्वारे पुर्णा नदीच्या पात्रातील पाणी कावडद्वारे आणून महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक अर्पण करुन तसेच गावातून काठी फिरवुन मंदिराला प्रदक्षिणा घालुन लग्न सोहळयाला सुरुवात करण्यात आली.यावेळी मंदिर परिसरात हजारो भाविक भक्त उपस्थित होते. सर्वांना अक्षदा वाटून गुलाबी रंगाची उध्ाळण करीत विध्ाीवत पुजा-अर्चा करुन संजय महाराज बावस्कर यांनी विधीवत मंत्रोपचार व मंगल अष्टक होऊन शिव-पार्वती विवाह उत्साहात संपन्न झाला.यावेळी पुजारी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खामगाव शहर अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,खामगाव तालुका अध्यक्ष मनोज वानखडे,केशवभाऊ कापले,सुटाळा बु.चे सरपंच  दिनेश इंगळे, उपसरपंच नारायण पाटील,ग्राम पंचायत सदस्य रवि भोपळे,महादेव संस्थानचे अध्यक्ष श्रीकृष्ण इंगळे आदींची उपस्थिती होती.

यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीला जलाभिष्ोक करुन पुजा-अर्चा केली.यावेळी बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की,महादेव संस्थानतर्फे शिव-पार्वती विवाह सोहळयाची शेकडो वर्षापासुन  सुरु असलेली धार्मिक परंपरा आजही अविरतपणे सुरु आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणारा हा शिव-पार्वती विवाह सोहळा म्हणजे सामाजिक एकोपा आणि श्रध्देचा प्रतीक आहे असे सांगून माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी उपस्थितांना शिव-पार्वती विवाह सोहळयाच्या शुभेच्छा दिल्या. 
याप्रसंगी महादेव संस्थानच्या वतीने अध्यक्ष श्रीकृष्ण इंगळे  यांनी शेला,टोपी व श्रीफळ देवुन तर ग्राम पंचायत सदस्य रवि भोपळे यांनी ग्राम पंचायतच्या वतीने शाल व पुष्पहार घालुन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचा सत्कार केला. या शिवपार्वती विवाह सोहळयाला प्रत्येक घरातुन रुखवंत मंदिरात आणतात व यावेळी काठी व दिवटयासह गावातील भजनी मंडळ वाजत गाजत मंदिराला पाच प्रदिक्षणा मारतात. लग्न समारंभाप्रमाणे सर्व विधी जसे देवकुंडी,मंगलाष्टके व लग्नानंतर महाप्रसाद पार पडले.यावेळी सुटाळा बु.,सुटाळा खु.येथील ग्रामस्थ व भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.हर-हर महादेव च्या जय घ्ाोषणाने परिसर भक्तीमय झाला होता.याप्रसंगी फटाक्यांची नयनरम्य आतिष्ाबाजी करण्यात आली. लग्न सोहळयानंतर भाविकांना रुखवंताच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घ्ोतला. शिव-पार्वती विवाह सोहळयाच्या पाच दिवसानंतर या परिसरात मोठी यात्रा भरत असते. यंदा चैत्र शुध्द द्वादषी म्हणजेच सोमवार दि.30 मार्च 2026 रोजी महादेव संस्थान, सुटाळा बु. भव्य यात्रा महोत्सव व पालखी सोहळयाचे  आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments