*श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी, मंडळाच्या वतीने श्री राम जन्मोत्सव साजरा*
श्री राम नवमी श्री राम जन्मोत्सव संपूर्ण भारतात मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात येतो चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार, चैत्र महिन्यातील नववा दिवस आहे या तिथीस भगवान विष्णू चा सातवा अवतार श्री राम यांचा झाला, अशी मान्यता आहे की हा दिवस राम नवमी म्हणून साजरा करतात दुपारी सुर्य डोक्यावर आल्यावर दुपारी १२ वाजता श्री राम जन्मोत्सव साजरा करण्यात येतो दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा
आज २६ मार्च गुरुवार रोजी श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने श्री राम नवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्व प्रथम सकाळी ११ वा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांच्या हस्ते प्रभु श्री राम व श्री सदगुरू एकनाथ महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले नंतर ११ ते १२ नामस्मरण.भजन, दुपारी १२ वा महिलांनी पाळणे गित गाऊन श्री राम जन्मोत्सव करण्यात आला नंतर महाआरती करून प्रसाद वाटप करण्यात आला दुपारी १2 ते १ -३० भजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
या प्रसंगी भजनी मंडळाचे अध्यक्ष देविदास शर्मा. विनोद सुकाळे. दिलीप झापर्डे. लालाजी सांगळे.विक्की देशमुख. बंटी देशमुख.सुशिला आवलकर.बेबी आवलकर.शकुंतला ढवळे.संगिता वाघोळे. शालीनी देशमुख. गायत्री देशमुख. वर्षा देशमुख. चंद्रकला काबळे. मानु शर्मा. पुष्पा कलोरे.व महिला.
नागरिकांची उपस्थिती होती अशी माहिती श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली,
0 Comments