*अर्धवेळ स्त्री परिचारिकांना जिल्हा परिषद स्थानिक विकास निधीतून मिळणार भाऊबीज भेट व गणवेश*
*सीटूच्या लढ्याला यश*
खामगाव /(संतोष आटोळे ) बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात गेल्या काही दशकापासून ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्र स्तरावर अर्धवेळ स्त्री परिचारिका अवघ्या तीन हजार रुपये मानधनावर काम करतात. सिटूच्या लढ्यामुळे त्यांच्या मानधनात तीन हजार रुपयांची वाढ राज्याच्या आर्थिक बजेट मध्ये नुकतीच झाली आहे. या तुकड्या मानधनाशिवाय त्यांना कुठलीही आजपर्यंत सामाजिक सुरक्षा मिळत नाही. परंतु गेल्या काही दिवसापासून सिटूचे जिल्हा अध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या पुढाकारात संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाबराव खरात व मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड यांची गेल्या वर्षभरात अनेकदा प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या सोबत वेळोवेळी चर्चा करण्यात आली. या चर्चेतून मार्ग काढून त्यांनी नुकत्याच सादर झालेल्या जिल्हा परिषद च्या आर्थिक बजेटमध्ये अर्धवेळ स्त्री परिचारकांना भाऊबीज भेट म्हणून 1000 रूपये व गणवेशासाठी 1000 रूपये प्रमाणे जिल्ह्यातील साडे तीनशे अर्धवेळ स्त्री परिचारिकांसाठी ६ लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या आर्थिक तरतुदीमुळे जिल्ह्यातील अर्धवेळ स्त्री परिचारिकांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या आज पर्यंतच्या इतिहासात महिलांचा सन्मान करणारे हे पहिले बजेट आहे. पंजाबराव गायकवाड जिल्हा अध्यक्ष ( सि टू)
0 Comments