*आरोग्यसेवेचा सुवर्णक्षण: डॉ. शारदा नितीश अग्रवाल व डॉ. प्रतिक्षा सागर देशमुख यांना राज्यस्तरीय ‘लोकस्वातंत्र्य विश्वशक्ती गौरव पुरस्कार’ अकोला येथे प्रदान*
खामगाव (संतोष आटोळे ) मानवतेची सेवा, आरोग्य क्षेत्रातील निःस्वार्थ योगदान आणि समाजासाठी केलेल्या अथक परिश्रमांना मानाचा मुजरा देत, डॉ. शारदा नितीश अग्रवाल (स्त्रीरोग विशेषज्ञ, अग्रवाल हॉस्पिटल, खामगांव) आणि डॉ. प्रतिक्षा सागर देशमुख (ॲडव्हांन्स होमिओपॅथी तज्ञ, अथर्व मल्टिकेअर क्लिनिक,खामगांव) यांना प्रतिष्ठित ‘लोकस्वातंत्र्य विश्वशक्ती गौरव’ हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ यांच्या वतीने आयोजित भव्य महिला सन्मान सोहळ्यात हा सन्मान देण्यात आला. रविवार, २९ मार्च २०२६ रोजी अण्णासाहेब रोकडे मिलन सभागृह, अकोला येथे पार पडलेल्या या सोहळ्यात राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. अनेक मान्यवर, अधिकारी, पत्रकार व सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी, भावनिक आणि अभिमानास्पद वातावरणात संपन्न झाला.
या सन्मानाचे खरे मानकरी ठरलेल्या दोन्ही डॉक्टरांनी आपल्या कार्यातून समाजाला नवी दिशा दिली आहे. "डॉ. शारदा अग्रवाल" यांनी अग्रवाल हॉस्पिटल, खामगांवच्या माध्यमातून स्त्रीरोग उपचारांची सुविधा उपलब्ध करून देत, हजारो रुग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा दिली आहे. त्यांच्या सेवेमुळे अनेक महिलांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि संपूर्ण उपचार मिळून नवजीवन लाभले आहे. त्यांनी केवळ उपचारच नाही, तर रुग्णांप्रती मायेची व समर्पणाची भावना जपत अनेक मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करून गरजू महिलांना व रुग्णांना मोठा आधार दिला आहे तर "डॉ. प्रतिक्षा देशमुख" यांनी अथर्व मल्टिकेअर क्लिनिक, खामगांवच्या माध्यमातून ॲडव्हांन्स होमिओपॅथीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत अनेक रुग्णांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवले आहे. मोफत आरोग्य शिबिरे, साइड-इफेक्ट फ्री उपचार आणि प्रत्येक रुग्णाकडे माणुसकीने पाहण्याची त्यांची वृत्ती; यामुळे त्यांच्या सेवेला केवळ वैद्यकीय मर्यादा न राहता ती एक विश्वास, एक आधार आणि नवजीवन देणारी शक्ती बनली आहे. त्यांच्या कार्यामुळे असंख्य रुग्णांच्या चेहऱ्यावर परत आलेले हास्य हेच त्यांच्या यशाचे खरे प्रतीक ठरले आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने या दोन्ही डॉक्टरांची निवड करून समाजातील खऱ्या सेवाभावी व्यक्तींना सन्मानित करण्याची आपली परंपरा अधिक दृढ केली आहे. संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि प्रेरणादायी नेतृत्वाखाली ही संस्था समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना ओळख, प्रेरणा आणि सन्मान देण्याचे महान कार्य सातत्याने करत आहे. हा पुरस्कार केवळ सन्मान नसून, वर्षानुवर्षे केलेल्या त्याग, समर्पण आणि निःस्वार्थ सेवेला मिळालेली खरी ओळख आहे. या सन्मानामुळे दोन्ही डॉक्टरांसह संपूर्ण परिवाराचा अभिमान उंचावला असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे—आणि हा क्षण प्रत्येकासाठी एक प्रेरणा ठरला आहे की, “सेवा आणि समर्पण असेल, तर यश आणि सन्मान आपोआप मिळतो.”
0 Comments